Indian Railway मध्ये AC कोच कायम ट्रेनच्या मध्यभागीच का असतो?

Indian Railway: रेल्वे प्रवास करणाऱ्या अनेकांनाच या रेल्वेबद्दल बरीचशी माहिती असते. रेल्वे प्रवासासाठीचे नियम आणि इतरही बरेच बारकाव्यांवर प्रवासी लक्ष ठेवून असतात. पण काही गोष्टी मात्र नकळत लक्षात येतात.   

सायली पाटील | Updated: Sep 26, 2023, 02:40 PM IST
Indian Railway मध्ये AC कोच कायम ट्रेनच्या मध्यभागीच का असतो?  title=
Indian Railways Why Ac Coaches are Always In The Middle Of Trains know details

Indian Railway: देशातील विविध राज्यांना, प्रांतांना जोडणाऱ्या भारतीय रेल्वे विभागानं आजवर असंख्य प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशा या रेल्वे विभागाकडून सातत्यानं प्रवाशांच्या सोयीसाठी बऱ्याच गोष्टींमध्ये बदल केले जातात. हे बदल प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रवाशांवरही परिणाम करत असतात. अशा या रेल्वे प्रवासादरम्यान तुम्ही कधी ट्रेनला व्यवस्थित पाहिलंय? पाहिलं असेलच. चला मग एका प्रश्नाचं उत्तर द्या, लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये AC कोच कायम मध्यभागीच का असतो? 

ट्रेनमध्ये AC Coach कायम मध्यभागी असण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील काही कारणं खालीलप्रमाणं... 

वेट डिस्ट्रीब्यूशन

ट्रेनमध्ये एसी कोच जोडण्यामागचं मुख्य कारण म्हणजे वेट डिस्ट्रीब्यूशन. ट्रेन सहसा बरीच लांब असते. साधारण 20 डब्यांच्या या ट्रेनमध्ये एसीचे डबे मध्येच जोडल्यामुळं वजन समप्रमाणात विभागणं सोपं होतं. 
 
ध्वनी आणि कंपन नियंत्रण 
लोकोमोटीव्ह ऑपरेशनमुळं ट्रेन मागेपुढे करताना अतिशय आवाज करते. शिवाय कंपनंही निर्माण होतात. पण, मध्येच एसी कोच असल्यामुळं हा प्रभाव कमी होतो. ट्रेनच्या आतमध्ये जास्त आवाज आणि कंपनं जाणवत नाही. ज्यामुळं दूरचा प्रवास करणं सहज शक्य होतं. 

प्रवाशांचं हित 
ट्रेनच्या मध्येच एसी कोच असल्यामुळं प्रवाशांसाठी ही बाब सोयीची ठरते. पुढच्या आणि मागच्या डब्यांमध्ये ट्रेन सुरु असताना अनेकदा धक्के जाणवतात. पण, एसी  कोचमध्ये मात्र असं चित्र दिसत नाही.

हेसुद्धा वाचा : दलाई लामा यांचे सूर बदलले? चीन- तिबेटसंदर्भात मोठं वक्तव्य 

 
एसी कोच सर्वात सुरक्षित 
प्रवाशांची सुरक्षितता हा विषय रेल्वेनं कायमच केंद्रस्थानी ठेवला आहे. ट्रेनच्या मध्येमध्ये एसी कोच असल्यामुळं ती रुळावरून उतरण्याची शक्यता कमी होते आणि इथं प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमीही मिळते. 

वरील कारणांव्यतिरिक्त आणखीही एका कारणामुळं ट्रेनचे एसी डबे मध्यभागी असतात. मध्ये एसी कोच असल्यामुळं ट्रेनच्या दोन्ही टोकांवर असणाऱ्या डब्यांमध्ये जास्त प्रवाशांना बसवता येतं. त्यामुळं प्रवाशांचा प्राधान्यक्रमही इथं लक्षात घेत त्यांना अपेक्षित सुविधा पुरवण्यात येतात. आता लक्षात आलं, ट्रेनच्या मध्येच एसी कोच का असतात ते?