भारतीय जवानांनी या वर्षात 151 दहशतवादी केले ठार, अजूनही इतके दहशतवादी सक्रीय

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाद्यांचा खात्मा सुरुच आहे. आतापर्यंत जवानांनी अनेक दहशवताद्यांना शोधून ठार केले आहे.

Updated: Nov 25, 2021, 07:22 PM IST
भारतीय जवानांनी या वर्षात 151 दहशतवादी केले ठार, अजूनही इतके दहशतवादी सक्रीय title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. काल सुरक्षा दलांनी TRF कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली कारवाई आणि त्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या 150 च्या पुढे गेली आहे. 

गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, या वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांच्या वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये 151 दहशतवादी मारले गेले आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी सर्वाधिक 86 दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सध्या लष्कराचे दहशतवादी नाव बदलून सुरक्षा दल आणि नागरिकांनाही लक्ष्य करत आहेत. यावर्षी जैशचे 11 दहशतवादीही मारले गेले आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनचे 26, अल बद्रचे 13, अन्सार गजवत उल हिंदचे 3 दहशतवादी ठार झाले असून 9 दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. जेवढ्या वेगाने अतिरेक्यांविरुद्ध कारवाई झाली, त्याच क्रमाने बडे दहशतवादी कमांडरही दहशतवादी भरती करण्यात गुंतले आहेत. खोऱ्यात अजूनही 199 दहशतवादी सक्रिय आहेत, ज्यात 110 स्थानिक आणि 89 विदेशी दहशतवादी आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दल एक योजना तयार करत आहेत. दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत 35 जवान शहीद झाले असून 82 जवान जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, मात्र देशाच्या शूर जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.