Kargil Hero In Indigo Flight: भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धात (Kargil War) भारताने पाकड्यांना सुळो की पळो करून सोडलं. भारतीय जवानांनी आपल्या शोर्याने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं. यामध्ये भारताचे अनेक जवान पराक्रम गाजवताना धारातीर्थी पडले. या जवानांबद्दल प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे. आजही अनेकजण कारगिल हिरोंचं कौतुक करत असतात. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीची मान गर्वाने उंचावल्याशिवाय राहणार नाही. (IndiGo pilot gives shoutout to Kargil Hero latest Marathi News)
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ इंडिगो (Indigo) फ्लाईटमध्ये असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पायलट एक घोषणा करताना दिसत आहे. या फ्लाईटमध्ये परमवीर चक्र मिळालेले सुभेदार मेजर संजय कुमार (Subedar Major Sanjay Kumar) उपस्थित होते. कारगिलच्या हिरोला (Kargil hero) इंडिगोमध्ये प्रवास करताना पाहून एका पायलटने ज्या पद्धतीने त्याचे स्वागत केले ते पाहून तुम्हालाही आनंद होईल. 2 मिनिट 10 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मेजर आपल्या सीटवर बसलेले दिसत आहेत.
आणखी वाचा - 11 वर्षाचं प्रेम शेवटी 'ती' हो म्हणाली... कॅप्टनने गुपचुप उरकलं लग्न; पाहा Photos
व्हिडीओमध्ये दिसतंय की, सर्व प्रवाशांसमोर क्रू मेंबर्स आणि पायलट उभे आहेत. त्यावेळी पायलटने घोषणा केली आणि संजय कुमार यांचं स्वागत केलं. त्यावेळी त्यांना भेटवस्तू देखील देण्यात आली. संजय कुमार यांनी सर्वांचे आभार मानले. इंडिगोने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तुमच्या माहितीसाठी, युद्धादरम्यान दिला जाणारा परमवीर चक्र (Param Veer Chakra) हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. भारतीय इतिहासात आतापर्यंत केवळ 21 जणांना हा सन्मान देण्यात आला आहे.
Flying with a hero: Subedar Major Sanjay Kumar ji, a Living Param Veer Chakra awardee! #goIndiGo #IndiaByIndiGo pic.twitter.com/CZsqlHxRj6
— IndiGo (@IndiGo6E) July 23, 2023
दरम्यान, हा व्हिडीओ (Trending Video) पाहून अनेकांनी कमेंट करत इंडिगोचे आभार मानले आहेत. या व्हिडीओमुळे माझा दिवस चांगला गेला, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर आमच्यासाठी ही गर्वाची गोष्ट आहे, असं दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.