इंद्राणी मुखर्जी आणि कार्ति चिदंबरमचा काय संबंध?

काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिंदबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम याच्या अटकेच्या प्रकरणानं आता राजकीय वळण घेतलंय. 

Updated: Feb 28, 2018, 10:11 PM IST
इंद्राणी मुखर्जी आणि कार्ति चिदंबरमचा काय संबंध? title=

मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिंदबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम याच्या अटकेच्या प्रकरणानं आता राजकीय वळण घेतलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, आयएनएक्स मीडियाच्या प्रकरणातील आरोप इंद्राणी मुखर्जी हिनं सीबीआयला दिलेल्या माहितीनंतर कार्तिला अटक करण्यात आलीय. 

Image result for indrani mukherjee zee
इंद्राणी मुखर्जी

कार्ति चिदंबरमनं एफआयपीबी (फॉरेन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड) क्लिअरन्ससाठी जवळपास ६.५ करोड रुपयांची मागणी केली होती, असं इंद्राणीनं म्हटलंय. यानंतर दिल्लीच्या पटियाळा हाऊस कोर्टानं कार्ति चिंदबरमला एका दिवसांच्या पोलीस कोठडीत धाडलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, दोन्ही प्रकरणं २००७ चे आहेत... ज्यावेळी पी चिदंबरम अर्थमंत्री होते. त्यांनीच कार्तिचं काम सोप्पं केलं होतं, असंही म्हटलं जातंय. याच प्रकरणात सीबीआयनं आयएनएक्स मीडिया, संचालक पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्यासोबत कार्ति चिदंबरम यांचंही नाव जोडलं जातंय. 

सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीनंच आयएनएक्स मीडियाकडून कार्तिला मिळालेल्या रक्कमेची माहिती सीबीआयला दिली होती. याच आधारावर एजन्सीनं १५ मे २०१७ रोजी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केलीय.