नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं ज्येष्ठ वकील इंदु मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीवर रोख लावण्यासाठी नकार दिलाय. कोर्टानं इंदिरा जयसिंह यांचा नियुक्ती रोखण्याचा आग्रह 'अकल्पनीय' असल्याचं म्हटलंय. जयसिंह यांनी त्यामुळे, वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकील पदावरून थेट न्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिल पदावरून त्या थेट न्यायाधीश बनणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला ठरणार आहेत. शुक्रवारी इंदू मल्होत्रा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदी शपथ घेण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार, असं याअगोदर कधीही झालेलं नाही. मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय वाय चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय खंडपीठानं नाराजी व्यक्त केलीय. उत्तराखंड हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश के एम जोसेफ यांनाही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायादीश म्हणून नियुक्त करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहे.
सरकारने 61 वर्षीय वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याच्या कोलेजियमच्या शिफारशीला मंजुरी दिली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात न्या. आर. भानुमती या एकमेव महिला न्यायाधीश आहेत... तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या इंदू मल्होत्रा या सातव्या महिला आहेत. १९८९ मध्ये ३९ वर्षीय एम. फातिमा बिबी यांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्यानंतर सुजाता मनोहर, रुमा पाल, ज्ञान सुधा मिश्रा, रंजना देसाई आणि आर भानुमती ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी विराजमान झाल्या होत्या.