मुंबई : इन्फोसिसच्या जवळपास ३६ वर्षांत पहिल्यांदाच कंपनीनं शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतलाय.
शनिवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत कंपनीनं बायबॅकला हिरवा कंदिल दिलाय. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंपनीला तब्बल १३ हजार करोड रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे.
कंपनीच्या निर्देशकांनी ५ रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या इक्विटी शेअर्सच्या बायबॅक प्रस्तावाला मंजुरी दिलीय. कंपनी हे बायबॅक ११५० रुपयांच्या किंमतीत करणार आहे. कंपनी तब्बल ११,३०,४३,४७८ शेअर बायबॅक करणार आहे. जो एकूण शेअर्सच्या ४.९२ टक्के आहे.
आपल्याच पैशांतून आपल्या कंपनीचे विकले गेलेले शेअर पुन्हा खरेदी करणं म्हणजे शेअर बायबॅक... बाजारात शेअरचे भाव कमी मिळत असताना अनेकदा कंपन्या बायबॅकचा मार्ग निवडतात.
बायबॅकमुळे कंपनीचं इक्विटी कॅपिटल कमी होतं. बाजारातून खरेदी केलेले शेअर संपुष्टात येतात. बायबॅक केलेले शेअर्स पुन्हा जाहीर केले जाऊ शकत नाहीत.