माधुरी दीक्षितसाठी 'बडी मुश्किल', ही इन्स्टाग्राम स्टार देतेय टक्कर!

या तरुणीचा साडीतील रिंग डान्स पाहून तुम्हीही आश्चर्यानं तोंडात बोटं घालाल

Updated: Jul 3, 2021, 09:49 PM IST
माधुरी दीक्षितसाठी 'बडी मुश्किल', ही इन्स्टाग्राम स्टार देतेय टक्कर! title=

मुंबई: सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता चक्क डान्सिंग क्विन माधुरी दीक्षितच्या बडी मुश्किल गाण्यावरील डान्सला टक्कर देणारा एक जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम स्टारने बडी मुश्किल गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

इन्स्टाग्राम स्टारने बडी मुश्किल गाण्यावर साडी नेसून रिंग डान्स केला आहे. हा रिंग डान्स थक्क करणारा आहे. रिंग घेऊन तिने केलेल्या अदा पाहण्यासारख्या आहेत. या स्टारने खूप सुंदर डान्स केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या इन्स्टाग्राम स्टारने रिंग डान्सचे आणखी काही व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र साडीतील व्हिडीओची सगळीकडे चर्चा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vaishnavi More (@d_a_n_c_i_n_g_d_o_l_l)

 

या इन्स्टाग्राम स्टारच्या या व्हिडीओला साधारण 3, 80,357 लोकांनी लाईक केलं आहे. तर 5 हजारहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. या स्टारचा व्हिडीओ पाहून इन्स्टाग्रामवर नेटकरी फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर साडी नेसून डान्स केल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र रिंग घेऊन केलेला हा डान्स थक्क करणारा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Tags: