पैसे जलद दुप्पट होण्यासाठी येथे गुंतवा!

पैसे लवकरात लवकर दुप्पट व्हावे, असे प्रत्येकालाच वाटते. 

Updated: Mar 3, 2018, 09:39 AM IST
पैसे जलद दुप्पट होण्यासाठी येथे गुंतवा! title=

नवी दिल्ली : पैसे लवकरात लवकर दुप्पट व्हावे, असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी आपण वेगवेगळी प्लॅनिंग्स करतो. विविध स्किम्समध्ये पैसे गुंतवतो. मात्र म्युचुअल फंडमध्ये पैसे सर्वात अधिक जलद गतीने पैसे दुप्पट होतात. पण अनेकदा आपला विश्वास बसत नाही. पोस्ट ऑफिसमध्ये पैसे सर्वात जलद गतीने दुप्पट होतात. 

बॅंकेत FD केल्याने पैसै १२ वर्षात दुप्पट

बॅंकेत FD केल्याने पैसै १२ वर्षात दुप्पट होतात. SBI सध्या ५-१० वर्षाच्या FD वर ६% व्याज देते. या व्याजाचा दरानुसार १ लाख रुपये १२ वर्षात २ लाख होतील.

SBI मध्ये FD केल्यास

  • ६.२५ % व्याज (५-१० वर्षाच्या FD)
  • १२ वर्ष लागतील
  • २ लाखांहुन काहीशी अधिक रक्कम

 पोस्ट ऑफिसमध्ये पैसे २ वर्षांपेक्षा कमी वेळात दुप्पट

बॅंकेच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमध्ये पैसे २ वर्षांपेक्षा कमी वेळात दुप्पट होतील. पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या टाईम डिपोस्झिटमध्ये सध्या ७.६% व्याज आहे. टाईम डिपोस्झिट एकवेळेस अधिकतर ५ वर्ष केले जाईल. पोस्ट ऑफिसमध्ये १० वर्षात पैसे दुप्पट होतील.

पोस्ट ऑफिस टाईम डिपोस्झिट

  • ७.६% व्याज
  • १ लाखांची रक्कम
  • १० वर्षात २ लाखांहुन अधिक रक्कम

येेथे होईल सर्वात जलद पैसे दुप्पट 

पोस्ट ऑफिसमध्ये किसान विकास पत्रमध्ये ११५ महिन्यांसाठी म्हणजेच ९ वर्षा ७ महिन्यांमध्ये पैसे दुप्पट होतील. पोस्ट ऑफिसमध्ये १०००, ५०००, १०,००० आणि ५०,००० रुपयांसाठी KVP सुरू करण्यात आली आहे. यात रक्कमेचे काही बंधन नाही. गरज भासल्यास अडीच वर्षात तुम्ही पैसे काढू शकता.