नवी दिल्ली : डॉक्टरांच्या असंवेदनशीलतेचे अनेक किस्से तुम्ही ऎकले असतील. पण काय कधी तुम्ही ऎकलंय की, ऑपरेशन थिएटरमध्ये एका रूग्णाला मरण्यासाठी सोडून डॉक्टर जोरदार भांडण करताहेत? होय. हे खरंय आणि याचा व्हिडिओ समोर आला आहे. या संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
रूग्णाला तडफडत ठेवत ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांच्या भांडणाचा हा प्रकार राजस्थानच्या जोधपूरमधील उमेद हॉस्पिटलचा आहे. या व्हिडिओतील डॉक्टर समोर असलेल्या रुग्णाचे ऑपरेशन सोडून वैयक्तिक कारणाने भांडण करत आहेत. ऑपरेशन टेबलवर असलेल्या महिलेच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाला आणि अशात तिचं ऑपरेशन लवकरात लवकर करणं गरजेचं होतं. मात्र, रूग्णाकडे दुर्लक्ष करून डॉक्टर भांडण करण्यात व्यस्त झाले आहेत. हे भांडण असंच अर्धा तास सुरू होतं, अशी माहिती आहे.
#WATCH Rajasthan: Verbal spat between two doctors in OT during the surgery of a pregnant woman in Jodhpur's Umaid Hospital (29.8.17) pic.twitter.com/eZfHHISQGB
— ANI (@ANI) August 30, 2017
When woman was admitted fetus was in distress,had low heartbeat, still will probe reason for newborn's death: Superintendent, Umaid Hospital
— ANI (@ANI) August 30, 2017
Both doctors have been removed immediately and disciplinary action will be taken against them: AL Bhat, Principal #Jodhpur pic.twitter.com/zJ8McUVoIG
— ANI (@ANI) August 30, 2017
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दोन्ही डॉक्टरांकडून अधीक्षकांनी जबाब मागितला आहे. या भांडत असलेल्या डॉक्टरांमध्ये एक आहेत महिला रोग तज्ञ डॉ. अशोक नैनीवाल आणि एक आहेत अॅनेस्थेशिया इंचार्ज डॉ. एमएल टाक. हा व्हिडिओ मंगळवार २९ ऑगस्टचा असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने कारवाई करत या दोन्ही डॉक्टरांना हटवण्यात आलं आहे.