IRCTC ने पुन्हा सुरू केली e-Catering सेवा, ऑनलाईन किंवा कॉल करून मागवता येईल ऑर्डर

रेल्वे प्रशासन IRCTC च्या अंतर्गत 200 स्थानकांवर पुन्हा प्रवाशांसाठी e-Cateringची सुविधा सुरू होत आहे.

Updated: Aug 5, 2021, 09:05 AM IST
IRCTC ने पुन्हा सुरू केली e-Catering सेवा, ऑनलाईन किंवा कॉल करून मागवता येईल ऑर्डर

मुंबई :  कोरोना काळात दीर्घ लॉकडाऊननंतर रेल्वे प्रशासन प्रत्येक पाऊल सांभाळून उचलत आहे. अनलॉकनंतर हळू हळू ट्रेन्सची संख्या वाढवण्यात आली. सुरक्षेची काळजी घेण्यात आली. त्यानंतर आता प्रवासादरम्यान e-Cateringची सुविधा देखील IRCTCकडून सुरू करण्यात येणार आहे.

रेल्वे प्रशासन IRCTC च्या अंतर्गत 200 स्थानकांवर पुन्हा प्रवाशांसाठी e-Cateringची सुविधा सुरू होत आहे. फुड ऑन ट्रॅक (Food on track) ची ऑर्डर देण्यासाठी IRCTCच्या e-Catering ऍपला डाऊनलोड करावे लागेल. किंवा इंटरनेट नसताना 1323 या नंबरवर कॉल करून जेवणाची ऑर्डर देता येईल.

e-Catering वरून जेवणाची ऑर्डर कशी द्यायची ?
रेल्वे प्रवासादरम्यान, e-Catering जेवणाची ऑर्डर देण्यासाठी  https://www.ecatering.irctc.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्या

त्यानंतर तुमच्या टिकिटावरील PNR नंबर नोंदवा. तुमच्यासमोर मेन्यु ओपन होतील. त्यातून ऑर्डर देता येईल.

ऑर्डर देताना पेमेंटचे रोखीत देण्याचा पर्याय देखील प्रवाश्यांसाठी उपलब्ध आहे.