लेह-लडाख फिरायला जायचंय? बुक करा IRCTC चं किफायतशीर पॅकेज; राहण्यापासून खाण्यापर्यंत कशाचीच चिंता नको

Irctc Tour package : भटकंतीची आवड असणाऱ्या अनेकांनाच काही ठिकाणांवर जाण्याची इतकी इच्छा असते, की विचारून सोय नाही. लेह लडाख हे असंच एक ठिकाण.   

सायली पाटील | Updated: Jun 25, 2024, 02:05 PM IST
लेह-लडाख फिरायला जायचंय? बुक करा IRCTC चं किफायतशीर पॅकेज; राहण्यापासून खाण्यापर्यंत कशाचीच चिंता नको  title=
Irctc Tour package leh ladakh tour package price latest news

Irctc Tour package : लेह लडाख....(Leh Ladakh) देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी भटकंतीची आवड असणारी मंडळी कायमच उत्सुक असतात. Leh Ladakh आमच्या बकेट लिस्टमध्ये केव्हापासून आहे, असा सूर इथं जाऊ न शकलेले कायमच आळवतात. तर, एकदातरी लेड लडाखला फिरण्यासाठी जा... असं इथून फिरून आलेली मंडळी सांगतात. बाईक राईड, रेल्वे किंवा फ्लाईट अशा पर्यायांचा वापर करून तुम्हीही हे ठिकाण गाठू शकता. 

काय म्हणता, सुट्टी नाहीय? हरकत नाही. कारण, आठवड्याभराच्याच सुट्टीमध्ये भारतीय रेल्वेच्या IRCTC कडून Magnificent Ladakh या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. जिथं तुम्हाला ऑगस्ट महिन्यात या पृथ्वीवरच्या एका सुरेख ठिकाणाची सफर करता येणार आहे. 6 रात्री आणि 7 दिवस अशा कालावधीसाठी असणाऱ्या या टूर पॅकेजमध्ये लेह, नुबरू, पँगाँग, तुर्तूक अशा ठिकाणी भेट देण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. 

5 ऑगस्ट 2024 मध्ये बंगळुरू येथून या टूरची सुरुवात होईल. रेल्वेच्या वतीनं आखण्यात आलेल्या या पॅकेजमधून फिरायला जायचा बेत तुम्हीही आखत असाल, तर www.irctctourism.com या संकेतस्थळाला भेट द्या. या पॅकेजमधूनच तुम्हाला विमानप्रवासामार्गे लेहमधून Up- Down ची सुविधा दिली जाईल. 

विमान खर्चासह या पॅकेजचा माणसी खर्च आहे, 57,700 रुपये. या प्रवासाविषयीच्या सविस्तर माहितीसाठी 8595931291 आणि 8595931292 हे दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आले आहेत. 

हेसुद्धा वाचा : 27 दिवसांचाच इंधनसाठा शिल्लक; सुनीता विलियम्स यांच्यापुढं अंतराळात नवं आव्हान; NASA कडून व्हिडीओ शेअर 

 
सिंगल शेअरिंगमध्ये तुम्ही तिकीट बुक करू इच्छिता, तर यासाठी माणसी 62950 रुपये, डबल शेअरिंग असल्यास 58200 रुपये, तीन व्यक्तींमध्ये शेअरिंग असल्यास 57700 रुपये इतका खर्च येईल. 5 ते 11 वयोगटातील मुलं सोबत असल्यास प्रती लहान मुल 56450 रुपये इतका खर्च येईल. 

बर्फाच्छादित डोंगर, तिथं असणारी जीवनशैली, प्रत्यक्षात आधुनिकीकरणापासून दूर असणारी आणि निसर्गाच्या कुशीत दडलेली गावं अशा अद्वितीय गोष्टी पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी आयारसीटीसीच्या या लडाख टूर पॅकेजमधून तुम्हाला मिळणार आहे. काय मग, कधी बेत आखताय?