मुंबई : आता रेल्वेमध्ये तुमच्या आवडीच्या जेवणाचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ई-कॅटरिंग सेवा पुन्हा एकदा सुरू केली आहे. (IRCTC's e-catering service resumed) 1 फेब्रुवारीपासून 250 रेल्वेमधील प्रवाशांना ही सुविधा 65 स्टेशनवर मिळत आहे. महाराषट्रातील नागपूर स्टेशनची यासाठी निवड करण्यात आली. प्रवासी ई-कॅटरिंग मोबाइल अँप 'फूड ऑन ट्रॅक' च्या ( Food on Track app) माध्यमातून तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑर्डर करता येणार आहे. (Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC)
भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) (IRCTC) 1 फेब्रुवारी 2021 रोजी रेल्वेगाड्यांमध्ये प्री-बुकिंग लंच आणि डिनर जेवणासाठी ई-केटरिंग सेवा पुन्हा सुरू केली आहे. कोरोना काळात रेल्वेला ई-केटरिंग सेवा स्थगित कराव्या लागल्या होत्या. देशात कोविड -19चा उद्रेक झाल्यामुळे सुमारे एक वर्ष ई-कॅटरिंग सेवा बंद होती. आयआरसीटीसीने ही सेवा पुन्हा सुरू केली आहे. आयआरसीटीसी वेबसाइट - www.ecatering.irctc.com वर किंवा दूरध्वनीद्वारे या सेवेचा लाभ घेता येणार आहे. तसेच ‘फूड ऑन ट्रॅक’ अॅपवर आयआरसीटीसी ई-कॅटरिंग सेवा देखील उपलब्ध आहे.
कोविड संकटाच्या वेळी भारतीय रेल्वेने बंद केलेली ई-कॅटरिंग सेवा आता 1 फेब्रुवारीपासून निवडक स्थानकांवर पुन्हा सुरू केली आहे. प्रवाशांना अधिक चांगली व प्राधान्य दिली जाणारी ही सेवा असणार आहे. केटरिंग पुरवण्यासाठी सर्व सुरक्षाविषयक नियम पाळत ही सेवा सुरू केली आहे, रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.