ISRO Recruitment 2022: इस्रोमध्ये प्रति महिना 1.5 लाख रुपयांची सरकारी नोकरी, असा कराल अर्ज

 जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

Updated: Aug 17, 2022, 07:53 PM IST
ISRO Recruitment 2022: इस्रोमध्ये प्रति महिना 1.5 लाख रुपयांची सरकारी नोकरी, असा कराल अर्ज title=

ISRO Teacher Recruitment 2022: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थान इस्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. इस्रोमध्ये प्राथमिक शिक्षक, पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक यासह विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून उमेदवार अधिकृत वेबसाईट sdsc.shar.gov.in वर अर्ज करू शकता.   28 ऑगस्ट 2022 पर्यंत apps.shar.gov.in वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. निवड प्रक्रियेचा भाग म्हणून अर्जदारांना संगणक आधारित चाचणी (CBT) मध्ये द्यावी लागेल. ही परीक्षा देशभरात घेतली जाणार आहे. लेखी आणि कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांना नोंदणीकृत ई-मेलवर सूचना दिली जाईल. कौशल्य चाचणीत पात्र ठरलेल्या आणि लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

या भरती प्रक्रियेतून पदव्युत्तर शिक्षक (गणित) दोन पदे, पदव्युत्तर शिक्षक (भौतिकशास्त्र) एक पद, पदव्युत्तर शिक्षक (जीवशास्त्र) एक पद, पदव्युत्तर शिक्षक (रसायनशास्त्र) एक पद, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (गणित) दोन पदे,  प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (हिंदी) दोन पदे,  प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (इंग्रजी) एक पद, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (रसायनशास्त्र) एक पद, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (जीवशास्त्र) एक पद, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (पीईटी पुरुष) एक पद, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (पीईटी महिला) एक पद, प्राथमिक शिक्षकाची पाच पदे भरायची आहेत.

पदव्युत्तर शिक्षक पदासाठी 47,600 ते 1,51,100  रुपये, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदासाठी 44,900 ते 1,42,400 रुपये, प्राथमिक शिक्षक पदासाठी 35,400 ते 1,12,400 रुपयांपर्यंत पगार असेल. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, पदव्युत्तर शिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षे असावे. शिक्षित पदवीधर शिक्षक पदांसाठी उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे. यासोबतच प्राथमिक शिक्षक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18  ते 30 वर्षे असावे.