डोनाल्ड ट्रम्प कन्या इव्हान्काच्या ड्रेसची चर्चा आणि किंमत?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हान्का आज चक्क भारतीय पेहरावात दिसल्या. 

Updated: Feb 25, 2020, 10:30 PM IST
डोनाल्ड ट्रम्प कन्या इव्हान्काच्या ड्रेसची चर्चा आणि किंमत? title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हान्का आज चक्क भारतीय पेहरावात दिसल्या. डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाईन केलेल्या पांढऱ्याशुभ्र शेरवानीमध्ये इव्हान्का शोभून दिसत होत्या. या ड्रेसची चर्चा जोरात आहे. मंगळवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हान्कांनी चक्क भारतीय वेशभूषा परिधान करून सर्वांनाच सुखद धक्का दिला. भारतीय डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाईन केलेल्या पांढऱ्या शेरवानीमधल्या इव्हान्का सुंदर दिसत होत्या.

हाताने विणलेला शेरवानी

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील हाताने विणलेल्या सिल्कची ही बंदगळा शेरवानी इव्हान्कांनी मस्त कॅरी केली होती. शेरवानीवर मेटल बटन्स आणि त्यावर हत्तीचे सुबक चित्र आहे. या पेहरावाला साजेशा अशा पारंपारिक गोल्ड पोलकी इयरिंग्ज इव्हान्का यांनी घातल्या होत्या. पांढऱ्या रंगाच्या पॉईन्टेट हिल्स शूजमध्ये त्यांचा वावर अतिशय सहज होता.   डिझायनर अनिता डोंगरे यांनी इव्हान्कांच्या या अॅपियरन्सनंतर याबाबत माहिती दिली.  

Ivanka Trump photographed at the Rashtrapati Bhavan. (Photo: ANI)

 राष्ट्रपीत भवन येथे इव्हान्का (Photo: ANI)

ही स्टाईल २० वर्षांपूर्वींची...

आम्ही ही स्टाईल २० वर्षांपूर्वी तयार केली आणि आजही ती किती सुंदर वाटत आहे. अगदी कोणत्याही रंगामध्ये ही शेरवानी करिश्मा करते. पण निळा, पांढरा आणि काळा हे माझे आवडते रंग आहेत, असे हा ड्रेस निर्मिती करणाऱ्या अनिता डोंगरे यांनी सांगितले. या शेरवानीची किंमत १ लाख रुपयांच्या आसपास आहे. 

डोंगरे यांनी यापूर्वी ब्रिटिश राजघराण्याची सून केट मिडलटन, अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, बेल्जियमच्या राणी माथिलदे, कॅनडाच्या फर्स्ट लेडी सोफी ग्रेगरी ट्रुडेऊ यांच्यासाठीही ड्रेस डिझाईन केलेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hyderabad House

A post shared by Ivanka Trump (@ivankatrump) on

अमेरिकेच्या फर्स्ट लेडीचे स्वागत

दरम्यान, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीतल्या एका शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांनी पारंपारिक थाटात आणि वेषभूषेत मेलानियाचं स्वागत केले. मेलानिया यांना भारतीय पद्धतीने कुंकू लावून आणि हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आलं. छोट्या छोट्या मुलांना पारंपारिक वेषात पाहून मेलानिया यांना या चिमुरड्यांचं कौतुक वाटत होतं. मग ही चिमुरडी मुलंच मेलानिया यांना कार्यक्रमस्थळी घेऊन गेली. मग मेलानिया यांच्यासमोर भारतीय पारंपारिक नृत्य सादर करण्यात आली. भारतीय संस्कृतीवर आधारित ही नृत्यं होती.

दिल्लीतल्या शाळेमध्ये हॅपीनेस क्लास अर्थात आनंदी राहण्याचा तास असतो. तो पाहण्यासाठी मेलानिया या शाळेत गेल्या होत्या. २०१८ पासून शाळेमध्ये या हॅपीनेस क्सालचा समावेष करण्यात आला. याअंतर्गत ५ ते १४ वयोगटातल्या विद्यार्थ्यांना मेडिटेशन शिकवले जाते. मेलानियाने या शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.