Delhi Crime : दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) काही दिवसांपूर्वी दोन आरोपींना अटक (Jahangirpuri Suspects Reveal) केली आहे. दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरी परिसरातून दोन संशयितांना अटक करून मोठा दहशतवादी कट उधळून लावल्याचा दावा केला आहे. या संशयितांना दिल्ली पोलिसांनी भालस्वा डेअरी परिसरातील एका घरावर छापा टाकून दोन हॅण्ड ग्रेनेडसह शस्त्रांसोबत ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघांनी एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी दिलेल्या जबाबामध्ये आरोपींनी आयएसआयएस (ISIS) पासून प्रेरित होऊन गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दिल्लीत एका 21 वर्षीय तरुणाचा शिरच्छेद करत त्याच्या हत्येचा 37 सेकंदांचा व्हिडिओ बनवला होता. या दोघांनी हा व्हिडिओ त्यांचा पाकिस्तानस्थित लष्करचा दहशतवादी सोहेल (Pakistan-based handler Sohail) याला पाठवला होता.
सोहेलवर असलेली निष्ठा सिद्ध करण्यासाठी आम्ही असे केले असे नौशाद (Naushad) आणि जगजीत सिंगने (Jagjit Singh) सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, 'सोहेलचा संबंध लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी होता आणि सध्या तो पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित आहे. आम्ही तो व्हिडिओ जप्त केला आहे.'
कशी केली हत्या?
14 डिसेंबर 2022 रोजी नौशाद आणि जगजीतला आदर्श नगर येथील एका पार्कात एक तरुण भेटला होता. हा तरुण अमली पदार्थाच्या आहारी गेला होता. दोघांनी त्याची फसवणूक करत ते त्या तरुणाला त्यांच्या घरी घेऊन गेले. आधी त्यांनी त्या तरुणाचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचे शिर धडापासून वेगळे केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी तरुणाच्या शरीराचे तुकडे केले. या सगळ्या घटनेचा त्यांनी व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे तलावात फेकून दिले.
पोलिसांना 14 जानेवारी रोजी एका मृतदेहाचे सहा तुकडे आणि काही कपडे सापडले होते. मात्र हत्या झालेला तरुण कोण होता याबाबत अद्याप पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पोलिसांनी तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले आहेत.
आरोपींचा पाकिस्तानची संबंध काय?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, नौशादला पहिल्यांदा जवळपास 30 वर्षांपूर्वी हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तिहार तुरुंगात असताना त्याची ओळख लश्कर ए तोयबाच्या मोहम्मद आरिफसोबत झाली होती ज्याला 2000 साली लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. दुसकीकडे नौशादची 2011 साली सोहेलसोबत ओळख झाली. 2013 साली सुटका झाल्यानंतर सोहेल पाकिस्तानात निघून गेला. 2018 साली बाहेर आल्यानंतर नौशादला एका प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली. यावेळी त्याची ओळख जगजीत सिंगसोबत झाली.
एप्रिल 2022 मध्ये बाहेर आल्यानंतर नौशादने तुरुंगातून बाहेर येताच पाकिस्तानातील सोहेलसोबत संपर्क साधला. काही दिवसांनी जगजीतसुद्धा तुरुंगाबाहेर आला. त्यानंतर नौशादने त्याची सोहेलसोबत ओळख करुन दिली. यानंतर काही पैशांचे व्यवहार झाल्यानंतर सोहेलने दोघांनी काही कामे सोपवली होती