ओवैसी शपथ घेताना 'जय श्रीराम'च्या घोषणा; उत्तर मिळालं 'जय भीम...'

शपथ घेतल्यानंतर मात्र असदुद्दीन ओवैसी सही करण्यास विसरले

Updated: Jun 18, 2019, 02:54 PM IST
ओवैसी शपथ घेताना 'जय श्रीराम'च्या घोषणा; उत्तर मिळालं 'जय भीम...' title=

नवी दिल्ली : मंगळवारी लोकसभेत काही खासदारांचा शपथविधी पार पडला. हैदराबादचे नवनिर्वाचित सदस्य आणि एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनीही यावेळी शपथ ग्रहण केली. असदुद्दीन शपथ घेण्यासाठी पुढे आले तेव्हा संसदेत 'जय श्रीराम' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा निनादल्या... शपथ ग्रहणासाठी पुढे सरसावलेल्या ओवैसी यांनी या घोषणा ऐकल्या... परंतु, शपथ घेतल्यानंतर मात्र त्यांनी 'जय भीम, जय मीन तनवीर, अल्लाह ओ अकबर... जय हिंद' अशी घोषणा दिली. ही विरोधकांसाठी चपराक ठरली. 

शपथ घेतल्यानंतर मात्र असदुद्दीन ओवैसी सही करण्यास विसरले. अधिकाऱ्यांनी आठवण करून दिल्यानंतर त्यांनी सही केली.

लोकसभेच्या पहिल्या सत्रातील दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी भाजपाच्या ओम बिर्ला, काँग्रेसचे शशी थरूर, शिरोमणी अकाली दलाचे सुखबीर बादल आणि अभिनेता सनी देओल सहीत अनेक नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ ग्रहण केली. १७ व्या लोकसभेच्या पहिल्या दिवशी काही कारणांनी संसदेत अनुपस्थित राहिलेल्या सदस्यांनी दुसऱ्या दिवशी शपथ ग्रहण केली.