Uri Infiltration : लष्करानं हाणून पाडली दहशतवाद्यांची घुसखोरी; Live Video मध्ये पाहता येतोय थरार

पाहा कशी करत होते घुसखोरी.... 

Updated: Aug 26, 2022, 11:59 AM IST
Uri Infiltration : लष्करानं हाणून पाडली दहशतवाद्यांची घुसखोरी; Live Video मध्ये पाहता येतोय थरार  title=
Jammu and kashmir Jammu and kashmir sector terrorist infiltration shot dead video viral

Uri infiltration : जम्मू- काश्मीरनजीक असणाऱ्या सीमाभागात पाकिस्तानकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्न अद्यापही कमी झालेले  नाहीत. पुन्हा एकदा पाकिस्तानमधून काही दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. पण, नियंत्रण रेषेवर असणाऱ्या संरक्षण दल आणि लष्कराच्या जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला. 

संरक्षण दलांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष गुप्तचर यंत्रणांनी सदर घटनेचा सुगावा दिल्यानंतर लगेचच इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या सहाय्यानं दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला. ज्यानंतर सैन्यानं 3 दहशतवाद्यांना ठार केलं. (Jammu and kashmir Jammu and kashmir sector terrorist infiltration shot dead video viral )

सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि त्यामध्ये दिसणाऱ्या मानवी आकृत्या पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. इथं संपूर्ण देश स्वच्छंदी आयुष्य जगत असतानाच तिथे सीमेनजीक मात्र घडणाऱ्या घडामोडी सर्वांनाच हादरवून गेल्या.