सोपोरमध्ये ग्रेनेड हल्ला, दोन जवान जखमी

परिसरात तपासाला वेग 

Updated: Mar 21, 2019, 12:19 PM IST
सोपोरमध्ये ग्रेनेड हल्ला, दोन जवान जखमी
संग्रहित छायाचित्र

श्रीनगर :  गुरुवारी जम्मू- काश्मीर येथील सोपोरमध्ये सैन्यदलावर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर लगेचच सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबारासही सुरुवात झाल्याचंही वृत्त मिळत आहे. सोपोरच्या मुख्य चौकात ही घटना घडली. ज्यामध्ये सैन्यदलातील काही जवान जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे जम्मू- काश्मीर येथील परिस्थितीतील तणाव आणखी वाढला आहे. 

हल्ला होताच, लगेचच दहशतवाद्यांना सैन्यदलाने घेरा घातला असून, संबंधित परिसरात तपास सुरू आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर येथील विविध भागांमध्ये सध्या काही दहशतवादी कारवायांना सैन्यदलाकडून उत्तर देण्यात येत आहे. 

सध्याच्या घडीला झालेला हा हल्ला पाहता संबंधित परिसरातील इंटरनेट सेवा ही सुरक्षेच्या कारणांसाठी खंडीत करण्यात आली आहे. एकिकडे हा ग्रेनेड हल्ला झालेला असतानाच पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. नौशेरा सेक्टरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.