जम्मू-काश्मीर : श्रीनगरच्या सीमेवर सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना केले ठार

जम्मू-काश्मीरमधील  (Jammu & Kashmir) दहशतवाद्यांविरुद्ध भारतीय लष्कराने मोठी कारवाई सुरु केली आहे.  

Updated: Jul 25, 2020, 12:28 PM IST
जम्मू-काश्मीर : श्रीनगरच्या सीमेवर सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना केले ठार    title=
संग्रहित छाया

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील  (Jammu & Kashmir) दहशतवाद्यांविरुद्ध भारतीय लष्कराने मोठी कारवाई सुरु केली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सैन्याने दोन दहशतवादी ठार ( Two terrorists killed by security forces ) केले आहे. अन्य काही दहशतवादी लपल्याची माहिती आहे. त्याचा शोध घेण्यासाठी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. 

जम्मू-काश्मीरचे पोलीस आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी लष्कराच्या अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांचा एक गटने खोऱ्यात लपवून राहिल्याची माहिती गुप्तचर स्रोतांच्या हवाल्याने मिळाली होती. त्यानंतर सैन्याने जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर (Srinagar) च्या सीमा रेषेजवळीलर रणबीरगडमध्ये शोध मोहीम सुरु केली. या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी जोरदार चकमक सुरु झाली. यात चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. .

भारतीय सैन्याला मिळालेल्या माहितीनुसार दोन ते तीन अतिरेक्यांची टीम या भागात लपल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एसओजी आणि सीआरपीएफ जवानांसह सैन्याच्या २९ राष्ट्रीय रायफल्सच्या गटाने या भागात शोध मोहीम सुरु केली आहे. येथील परिसर हा सर्व बाजूंनी घेरण्यात आला आहे. काश्मीर विभागाच्या पोलिसांनीही ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x