चकमकीनंतर भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

 तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.

ANI | Updated: Oct 16, 2019, 12:55 PM IST
चकमकीनंतर भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा title=
Pic Courtesy: ANI

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये काल रात्रीपासून चकमक सुरु होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. सुरक्षा रक्षकाच्या जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले होते. दरम्यान, दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरु होता. अखेर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.

अनंतनागमधील बिजबेहरा परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली होती, अशी माहिती काश्मीर पोलिसांनी दिली. अनंतनागमधील चकमकीत लष्कर-ए-तैय्यबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यीय गटाचा खात्मा करण्यात आला. एलईटी कमांडर नासिर चद्रू, जावेद फारूक आणि अकीब अहमद या तिघांना ठार करण्यात आले.

दरम्यान, काल रात्री उशीरा भारतीय लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यानंतर जवानांनी अनंतनागमधील बिजबेहरा परिसराला वेढा दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार तीन दहशतवादी लपल्याचे कळले. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान अधिक सर्तक झालेत. त्यांनी आपली मोहीम आज यशस्वी करत तीन दहशतवाद्यांना ठार केले.