या चिमुकलीच्या डान्सनं जिंकलं नेटकऱ्यांचं मन, म्हणाली 'राधा कैसे न जले....!'

जन्माष्टमीच्या मुहूर्तावर या चिमुकल्या राधानं जिंकलं सर्वांचं मन...का होतेय या व्हिडीओची चर्चा एकदा पाहाच  

Updated: Aug 30, 2021, 07:51 PM IST
या चिमुकलीच्या डान्सनं जिंकलं नेटकऱ्यांचं मन, म्हणाली 'राधा कैसे न जले....!' title=

मुंबई: कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव केवळ उत्तर भारतातच नाही तर संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. या कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह मोठ्यांपासून लहानांपर्यंत असतो. या दिवशी लहान मुलं कृष्ण आणि राधासारखे तयार होऊन फोटो काढतात. डान्स करतात आणि मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. 

जन्माष्टमीच्या निमित्तानं चिमुकल्या राधानं खूप सुंदर डान्स केला आहे. या चिमुकल्या राधाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. एकही स्टेप टीव्हीवर न पाहता तिने हा डान्स जसाच्या तसा केला आहे. तिच्या डान्सची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. 

लगान चित्रपटातील राधा कैसे न जले या गाण्यावर या चिमुकलीनं खूप अप्रतिम डान्स केला आहे. राधा सारखा वेश परिधान करून तिने खूप सुंदर डान्स केला आहे. या गाण्यातील अभिनेत्रीसारख्या हुबेहुब डान्स स्टेप्सही तिने कॉपी केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

तानिया अॅण्ड सोनी नावाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युझर्सनी कमेंट केल्या आहेत. एक युझर म्हणाला की हा डान्स खूपच सुंदर आहे. तुमचा डान्स खरंच मनमोहक आहे. मला हा परफॉरमन्स खूपच आवडा असंही एक युझरने म्हटलं आहे.