जयललिता यांचा रुग्णालयातला व्हिडिओ आला समोर

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणुकीआधीच्या पहिल्या दिवशी एक व्हिडिओ समोर आला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 20, 2017, 12:22 PM IST
जयललिता यांचा रुग्णालयातला व्हिडिओ आला समोर title=

नवी दिल्ली : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणुकीआधीच्या पहिल्या दिवशी एक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओ आला समोर

हा व्हिडिओ टीटीव्ही दिनकरन यांनी जारी केला आहे. जयललिता रुग्णालयात दाखल असतांनाचा हा व्हिडिओ आहे. अपोलो हॉस्पिटलच्या उपचार घेत असतांनाचा हा व्हिडिओ आहे. एआयएडीएमकेच्या काही लोकांनी जयललिता यांच्या मृत्यूमध्ये संशय व्यक्त केला आहे. विरोधकांनी देखील असाच दावा केला आहे.

मृत्यूबाबत संशय

अपोलो हॉस्पिटलने सांगितलं की जयललिता यांना प्रकृती खराब असतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. टीटीव्ही दिनकरन समर्थक पी. व्हीत्रिवेल यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी म्हटलं की, 'जयललिता यांना हॉस्पिटलमध्ये कोणीही नाही भेटलं हे चुकीचे आहे. हा व्हिडिओ त्या गोष्टीचा पुरावा आहे. आम्ही हा व्हिडिओ जारी करण्यासाठी अनेक दिवस वाट पाहिली. चौकशी समितीने आम्हाला अजून कोणताही समन्स नाही बजावला. जर तसं झालं तर आम्ही व्हि़डिओ त्यांना देऊ.'

राजकीय फायद्यासाठी ?

दिनाकरन यांनी यावर्षी सप्टेंबरमध्येही म्हटले होते की हॉस्पिटलमध्ये जयललिता यांनी मावशी आणि शशिकला यांनी काही मिनिटांचा हा व्हिडिओ शूट केला होता. आरके नगर पोटनिवडणुकीआधी हा व्हिडिओ जारी करणं यामागे राजकारण असल्याचं बोललं जातं आहे. दिनाकरन यांनी हा व्हिडिओ जारी करण्यास नकार दिला होता. दिनाकरन यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले असून चौकशी सुरु आहे.