Valentine Day 2018 : जिग्नेश मेवानीने पोस्ट केला प्रियाचा व्हिडिओ, झाला ट्रोल

जगभरात आजचा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा होतोय. 

Updated: Feb 14, 2018, 02:02 PM IST
Valentine Day 2018 : जिग्नेश मेवानीने पोस्ट केला प्रियाचा व्हिडिओ, झाला ट्रोल

मुंबई  : जगभरात आजचा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा होतोय. 

पण आज एक व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे गुजरातचे युवा आमदार जिग्नेश मेवानी सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. काही युझर्सनी मेवानींच्या या व्हिडिओवर भरपूर अश्लील आणि आपत्तिजनक कमेंट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारिअरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओलाच जिग्नेश यांनी आपल्या ऑफिशिअर अकाऊंटवर पोस्ट केला. व्हिडिओ पोस्ट करताना जिग्नेशने आरएसएसवर निशाना साधला आहे. 

काय म्हटलंय जिग्नेश मेवानी यांनी 

जिग्नेश यांनी ट्विट केलं आहे की, हॅप्पी व्हॅलेंटाईन डे, प्रिया प्रकाश वारिअरचा व्हायरल हिट व्हिडिओ आरएसएसच्या व्हॅलेंटाईन डेच्या विरूद्ध अगदी योग्य उत्तर आहे. त्यामुळे एकदा पुन्हा भारतीयांनी पटवून दिलं की, भारतीय द्वेषापेक्षा प्रेमाला अधिक पसंत करतात. म्हणून या व्हिडिओला पाहून एन्जॉय करा. 

लोकांनी काय केल्या कमेंट जिग्नेशने हा व्हिडिओ पोस्ट करताच ट्विटरवरून अनेक कमेंट आल्या. लोकांनी या व्हिडिओत प्रेम नसून वासना असल्याचं म्हणत जिग्नेश मेवानीला ट्रोल केलं आहे. लोकांनी म्हटलं की, कुणाला कमीपणा दाखवण्यासाठी तुम्ही किती खालज्या पातळीवर उतरता.

यासारखे अनेक उत्तर त्यांना ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. या उत्तरांवरून जिग्नेश मेवानी ट्रोल झाले आहेत.