लालकिल्ल्यावर ८ दिवसांचा राष्ट्र सुरक्षा महायज्ञ

 दिल्लीतल्या ऐतिहासिक लालकिल्लायवर आजपासून राष्ट्र रक्षा यज्ञाच्या तयारीला सुरूवात होते आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 14, 2018, 12:45 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीतल्या ऐतिहासिक लालकिल्लायवर आजपासून राष्ट्र रक्षा यज्ञाच्या तयारीला सुरूवात होते आहे.

लाल किल्ल्यावर 111 यज्ञकुंड

गृहमंत्री राजनाथ सिंह यज्ञासाठी माती आणि पाणी गोळा करण्यासाठी आयोजित रथ यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. आठ दिवस चालणाऱ्या यज्ञासाठी लाल किल्ल्यावर 111 यज्ञकुंड उभारण्यात येत आहेत.

अनेक केंद्रीय मंत्री राहणार हजर

येत्या चैत्र नवरात्रात हा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे.  अनेक केंद्रीय मंत्री आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यात्रा आणि यज्ञाकडे 2019च्या निवडणूकीची तयारी म्हणून बघितलं जातं आहे.