सोपोरमध्ये दहशतवादी - जवान यांच्यात जोरदार चकमक

जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवादी आणि जवान यांच्या धुमश्चक्री सुरु आहे.

Updated: Sep 9, 2017, 10:40 AM IST
सोपोरमध्ये दहशतवादी - जवान यांच्यात जोरदार चकमक title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवादी आणि जवान यांच्या धुमश्चक्री सुरु आहे.

सोपोरमधल्या रिवान परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती समोर आलीय. यानंतर भारतीय जवानांकडून या परिसरात सर्च ऑपरेशन राबवले गेले आहे. यावेळी दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. 

भारतीय जवानांनीही या गोळीबाराला जशास तसं उत्तर दिलंय. अजूनही ही धुमश्चक्री सुरुच आहे.