Intelligence Bureau Recruitment Sarkari Naukri : (Government job) सरकारी खात्यात नोकरी करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. सर्वांनाच ही संधी मिळते असं नाही. हो, पण ज्यांना ही संधी मिळते, ती मंडळी मात्र जीवाचं रान करून नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. सध्या भारतीय गुप्तहेर खात्यात नोकरीसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असून, त्यासाठीची सविस्तर माहितीही समोर आली आहे.
एरव्ही चित्रपटांमध्ये गुप्तहेर, त्यांची कामं आणि तत्सम गोष्टींबाबत पाहण्यापुरताच मर्यादित न राहता आता तुम्हाला गुप्तहेर खात्यात अधिकारी पदावर नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अख्त्यारित असणाऱ्या इंटेलिजंस ब्यूरो (IB) अर्थात गुप्तहेर खात्यात 797 कनिष्ठ गुप्तहेर अधिकारी (JIO), ग्रेड 2 (टेक्निकल) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होकत आहे.
सदर विभागाकडून जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार अधिकारी पदासाठीची ही नोकरभरती 3 जून 2023 रोजी सुरु होणार असून, ती 23 जूनपर्यंत सुरु राहील. ही भरती प्रक्रिया टियर 1, टियर 2 आणि टियर 3 परीक्षेनंतर सुरु होणार आहे.
एसटी-59
एससी-119
ओबीसी-215
इडब्ल्यूएस-79
अनारक्षित-325
तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या नोकरीसाठी अर्ज करू इच्छित असल्यास mha.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
नोकरीसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्यांचं वय 18 ते 27 वर्षे इतकं असावं. आणि त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन, कंम्प्यूटर सायन्स अथवा इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमापर्यंतचं शिक्षण घेतलेलं असणं अपेक्षित आहे. किंवा Electronics, Computer science किंवा फिजिक्स, गणितात Bsc मधील पदवी शिक्षण घेतलेलं असावं.
अर्जदारांनी अर्ज दाखल करताना अनारक्षित, ओबीसी आणि EWS वर्गाला 500 रुपये आणि इतर वर्गाला 450 रुपये अशी Application Fee भरावी लागेल.
IB मध्ये कनिष्ठ गुप्तहेर अधिकारी या पदासाठी 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. जिथं प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल. लेखी परीक्षेमध्ये 1/4 Negative Marking असेल. या भरतीची प्रक्रिया काही टप्प्यांमध्ये पार पडेल. हे टप्पे खालीलप्रमाणं....
- ऑनलाईन लेखी परीक्षा
- गुणचाचणी
- मुलाखत
- कागदपत्रांची पडताळणी
- वैद्यकिय चाचणी