देशी जुगाड! नॅनो कारवर लावले सोलर पॅनल; कमी किंमतीत इलेक्ट्रिक कार तयार

 इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे मध्यमवर्ग अडचणीत सापडला आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर परिसरतील एका व्यक्तीने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीतून मार्ग काढला आहे.

Updated: Sep 18, 2021, 08:06 PM IST
देशी जुगाड! नॅनो कारवर लावले सोलर पॅनल; कमी किंमतीत इलेक्ट्रिक कार तयार

दुर्गापूर : इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे मध्यमवर्ग अडचणीत सापडला आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर परिसरतील एका व्यक्तीने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीतून मार्ग काढला आहे. या व्यक्तीने सौर ऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार बनवली आहे. नॅनो कारला कस्टमाइज करून त्यांनी तिला सोलर पॉवरमध्ये बदलले आहे. मनोजित मंडल असे या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या जुगाडामुळे दुर्गापूर परिसरात चर्चा सुरू आहे.

मंडल यांनी नॅनो कारच्या छतावर सोलर पॅनल लावले आहेत. पॅनलच्या माध्यमातून बॅटरी चार्ज होऊ शकेल. कार याच बॅटरीवर फिरत आहे. सौर ऊर्जेपासून चालणारी कार बनवण्यासाठी त्यांनी नॅनो कारलाच का निवडले त्याची काही कारणं आहेत.

  • नॅनो कार लहान असल्याने वजन कमी
  • कारला कमी हॉर्स पावरची गरज
  • कमी हॉर्स पावरमुळे जास्त अंतर कापणार

मंडल या कारला व्यवसायिक स्वरूप देऊ पाहत आहेत. सध्याच्या इलेक्ट्रिक कार मध्यमवर्गीयांच्या बजेटपेक्षा जास्त महाग आहेत. त्यामुळे बजेटमधील इलेक्ट्रिक कार बनवण्याचे मंडल यांचे स्वप्न आहे.