नक्की ट्रेन आहे की बस, हा जुगाड पाहून तुम्ही म्हणाल रस्त्यावर अवतरली ट्रेन

ही ट्रेन आहे की बस? असा Creative जुगाड पाहून तुम्ही हैराण व्हाल... अशा बसने प्रवास करायला आवडेल का?

Updated: Oct 17, 2021, 06:27 PM IST
नक्की ट्रेन आहे की बस, हा जुगाड पाहून तुम्ही म्हणाल रस्त्यावर अवतरली ट्रेन

नवी दिल्ली: ट्रेन आणि बस दोन्हीमधून प्रवास केला असेल. मात्र ट्रेनच्या बोगीसारखी बस असेल तर त्यामधून तुम्हाला प्रवास करायला आवडेल का? ट्रेनच्या बोगीसारखी लांबलचक बस तयार कऱण्यासाठी एक खास जुगाड करण्यात आला आहे. हा जुगाड पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की रस्त्यावरच ट्रेनमध्ये बसल्याचा फील येईल. अशा क्रिएटीव्ह जुगाडाला तुम्ही काय म्हणाल.

भारतात प्रत्येक गोष्टीवर उत्तर आहे ते म्हणजे जुगाड. इथल्या लोकांच्या क्रिएटिव्हिटीला खरंच तोड नाही. ही क्रिएटिव्हिटी पाहून अनेक लोक तोंडात बोट घालतील. सरकारी खात्यांमध्ये सुद्धा देसी जुगाडच्या आधारे अनेक कामे केली जात आहेत आणि ती खूप यशस्वीही आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सार्वजनिक वाहतुकीची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही.

सार्वजनिक वाहतूक विभागाने हा जुगाड करून रितसर एक दगडात दोन पक्षी मारले. त्यांनी आधी दोन बस एकमेकांना जोडून रेल्वेच्या बोगीसारखं स्वरुप तयार केलं. जेणेकरून बर्‍याच प्रवाशांना एकाच वेळी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देता येईल. शिवाय दोन ऐवजी एकच ड्रायव्हर राहतील. 

या जुगाडमध्ये दोन बसेस ट्रेनच्या दोन डब्यांप्रमाणे एकत्र जोडण्यात आल्या आहेत. यामुळे, बरेच प्रवासी एकाच वेळी आरामात प्रवास करू शकतात. सार्वजनिक वाहतुकीचा हा वापर कर्नाटक राज्यात केला गेला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे फक्त एका बसने केले गेले नाही. उलट, बसस्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसेसना रेल्वेचे स्वरूप देण्यात आलं आहे.

Tags: