शालेय विद्यार्थ्यांची मज्जा! जुलैमध्ये 'इतके' दिवस शाळा राहणार बंद; पाहा यादी!

July School Holidays:  उन्हाळ्याच्या सुट्या जवळपास सर्वत्र संपल्या असून आता शाळा सुरू झाल्यायत. जुलै महिना किती सुट्ट्या घेऊन येत आहे हे विद्यार्थ्यांना माहिती असायला हवे.

Pravin Dabholkar | Updated: Jun 29, 2024, 03:31 PM IST
शालेय विद्यार्थ्यांची मज्जा! जुलैमध्ये 'इतके' दिवस शाळा राहणार बंद; पाहा यादी!  title=
July School Holidays

July School Holidays:  मे महिन्याची सुट्टी संपून आता शाळांना सुरुवात झालीय. बॅगेत पुस्तके भरुन, क्लासेसचे नियोजन करुन जून महिन्यापासून विद्यार्थी शाळेत जाऊ लागतात. तरीही विद्यार्थ्यांना ओढ असते ती शालेय सुट्ट्यांची. एव्हाना मुलांना शाळांमधून डायरी मिळाली असेल. त्यात महिन्यातील सुट्ट्यांचा तपशील देण्यात आलेला असतो. पण अजूनही कोणी डायरी पाहिली नसेल तर त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.

जुलै महिना सुरु होतोय. दरम्यान या महिन्यात किती सुट्ट्या? हे तुम्हाला पाहायचे असेल तर पुढे तुम्हाला यादी देण्यात आली आहे. यामध्ये साप्ताहिक सुट्या व्यतिरिक्त येत्या जुलै महिन्यात शाळा आणि महाविद्यालयांना काही दिवस सुट्या असतील? याची माहिती देण्यात आली आहे. 

जूनचा अर्धा महिना सुट्ट्यांमध्येच जातो. शाळा सुरु होते तोपर्यंत जोराचा पाऊस देखील आलेला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना आयती सुट्टी मिळते. उन्हाळ्याच्या सुट्या जवळपास सर्वत्र संपल्या असून आता शाळा सुरू झाल्यायत. जुलै महिना किती सुट्ट्या घेऊन येत आहे हे विद्यार्थ्यांना माहिती असायला हवे. जुलै महिन्यात शाळा आणि महाविद्यालये कधी बंद राहतील? हे जाणून घेऊया. 

जुलै 2024 मध्ये शाळा किती दिवस बंद?

दर महिन्याप्रमाणे जुलैमध्येही शाळांना चार दिवसांची साप्ताहिक सुट्टी असेल. शाळांना त्यांच्या मॅनेजमेंटकडून ठराविक दिनी सुट्टी दिली जाते. काही ठिकाणी रविवारसोबतच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल. अधिकृतपणे पाहिले तर चार रविवारसह आणखी एक दिवस सुट्टी असेल.

मोहरम निमित्त बुधवारी 17 जुलै रोजी संपूर्ण भारतभर शाळा बंद राहणार आहेत.अनेक ठिकाणी महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मुलांना सुट्टी असते.

जुलैच्या सुट्ट्यांची यादी

7 जुलैला पहिल्या रविवारी शाळा बंद असतील.13 जुलैला पहिला शनिवार आणि 14 जुलैला दुसरा रविवार म्हणून शाळा बंद राहतील.
7 जुलैला मोहरमनिमित्त शाळांना सुट्टी असेल. तर 21 जुलैला तिसरा रविवार म्हणून मुलांना सुट्टी असेल. 27 जुलै  आणि 28 जुलै रोजी चौथा शनिवार आणि चौथा रविवार म्हणून शाळांना सुट्टी असेल.

लॉंग विकेंड नाही 

अनेक विद्यार्थी आणि पालक दर महिन्यात लॉंग विकेंडच्या शोधात असतात. पण जुलैमध्ये तुम्हाला ती संधी मिळणार नाही. जुलै महिन्यात शनिवार-रविवारला लागून जास्त सरकारी सुट्ट्या नाहीत.
त्यामुळे या कालावधीत तुम्हाला कोणताही लॉंग वीकेंड मिळणार नाही. 

कसे कराल प्लानिंग?

लॉंग विकेंड नसला तरी तुम्ही 15 आणि 16 जुलैला सुट्टी घेतली तर तुम्हाला 13 जुलै ते 17 जुलै अशी पाच दिवसांची मोठी रजा मिळू शकते. या काळात तुम्ही पावसात भिजण्याचा आनंद लुटू शकता.  ओडिशामध्ये 7 जुलैला रथयात्रेनिमित्त सुटी जाहीर करण्यात आली आहे.