तिने बाबांना दिलेलं वचन मोडलं, प्रसिद्ध अभिनेत्रीनं काय म्हटलंय सुसाईड नोटमध्ये...

टीव्ही अभिनेत्रीनं लिहिली 4 पानांची सुसाईड नोट...या नोटमध्ये तिने दिलेल्या वचनाचा उल्लेख... अखेर वडिलांना दिलेलं ते वचन अभिनेत्रीनं मोडलंच 

Updated: Sep 30, 2021, 08:41 PM IST
तिने बाबांना दिलेलं वचन मोडलं, प्रसिद्ध अभिनेत्रीनं काय म्हटलंय सुसाईड नोटमध्ये... title=

मुंबई: गेल्या वर्षभरापासून बऱ्याच कलाकरांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्येचा निर्णय घेतल्याने मनोरंजन विश्वास मोठी खळबळ उडाली आहे. वारंवार अशा घटना होत आहेत. मनोरंजन विश्वातून पुन्हा एक बातमी येत आहे. प्रसिद्घ टीव्ही अभिनेत्रीनं आपलं आयुष्य संपवलं आहे. 4 पानांची सुसाईड नोट लिहून तिने हा टोकचा निर्णय घेतला. या अभिनेत्रीनं आपल्या वडिलांना दिलेलं वचनही मोडलं. 

टीव्ही अभिनेत्री सौजन्याचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांचा प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना घरात सुसाईड नोटही मिळाली आहे. 25 वर्षीय सौजन्याने 'चौकटू फन' आणि 'नानोब्बने ओल्लेयावनु' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौजन्याने गुरुवारी शहराच्या बाहेरील कुंबलगोडुजवळ डोड्डाबेले येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केल्याचं सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौजन्याचा मृतदेह घरात छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. ही अभिनेत्री कोसाडू जिल्ह्यातील कुशलनगर येथील रहिवासी होती. अभिनेत्रीच्या घरातून चार पानांची सुसाईड नोटही सापडली आहे. ज्यात तिने हे पाऊल उचलल्याबद्दल 'दु:ख' व्यक्त केलं. सौजन्याने तिच्या सुसाईड नोटमध्ये तिच्या मानसिक स्थितीबद्दलही सांगितलं आहे. 

काय लिहिलंय सुसाई नोटमध्ये 

सौजन्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं, 'मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी आयुष्यात कधीही मूर्खपणासारखा निर्णय घेणार नाही. मात्र माझ्याजवळ कोणताही पर्याय उरला नव्हता. मी आतून रोज मरत आहे. दिवसेंदिवस अधिक तुटत चालले आहे.' या सुसाईड नोटमध्ये सौजन्याने आपल्या वडिलांची माफी मागितली आहे. सौजन्याने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले, 'आई-बाबा, मला क्षमा करा, माझ्या आत्महत्येला मीच जबाबदार आहे'.

सौजन्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती. गेल्या काही काळापासून ती नैराश्येत आणि तणावाखाली असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यातून तिने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. पोलिसांनी सौजन्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.