कर्नाटक पोटनिवडणूक: मतदारांना वाटण्यासाठी आणलेले कूकर जप्त

कर्नाटकमध्ये ५ डिसेंबरला १५ जागांसाठी पोटनिवडणूक

Updated: Nov 19, 2019, 09:28 AM IST
कर्नाटक पोटनिवडणूक: मतदारांना वाटण्यासाठी आणलेले कूकर जप्त title=

बंगळुरु : कर्नाटकमध्ये ५ डिसेंबरला १५ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. कारण या १५ जागा जिंकल्या तरच कर्नाटकातील भाजपचं सरकार टिकणार आहे. याआधी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी पक्षातील नाराज नेत्यांची समज काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ६ मतदारसंघातील नेते हे पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही चिंतेची गोष्ट आहे. मागच्या निवडणुकीत पराभव झाला त्याच मतदारसंघातून विरोधी पक्षातून आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांमुळे आधीचे पक्षाचे उमेदवार नाराज आहेत.

कर्नाटकातील या पोटनिवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित नेते वेगवेगळे फंडे वापरत आहेत. त्यातच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई करत ५३ कुकर जप्त केले आहेत. एका घरातून हे कूकर जप्त करण्यात आले आहेत. हे कूकर मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आल्याची माहिती निडवणूक अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

भाजपने काँग्रेस, जेडीएसच्या बंडखोर आमदारांना पुन्हा निवडणुकीत उतरवलं आहे. भाजपला कमीत कमी ८ जागा जिंकाव्या लागणार आहेत.