Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये भाकरी फिरणार? पाहा Exit Poll चे निकाल

Karnataka Exit Poll Result Live : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. तेरा तारखेला मतमोजणी होणार असून त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत  

राजीव कासले | Updated: May 10, 2023, 07:33 PM IST
Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये भाकरी फिरणार? पाहा Exit Poll चे निकाल  title=

Karnataka Exit Poll Result Live: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी आज मतदान (Voting) पार पडलं. 224 जागांसाठी 2615 उमेदवार रिंगणात असून एकूण 66 टक्के मतदान झालं आहे. 13 मे कर्नाटकमध्ये (Karnataka Election) कोणाची सत्ता येणार याचा फैसाल होईल. त्याआधी ZEE NEWS आणि MATRIZE ने केलेले एक्झिट पोल समोर आले आहेत. 

कर्नाटकमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. पण कर्नाटकमध्ये भाकरी फिरण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार (Exit Poll) कर्नाटकमध्ये नागरिकांनी काँग्रेसला (Congress) झुकतं माप दिल्याचं दिसतंय. काँग्रेसला 103-118 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाला (BJP) 79-94 जागांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जेडीएसला (JDS) 25-33 जागांची शक्यता आहे. इतर पक्षांना 2 ते 5 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. 

ZEE NEWS आणि MATRIZE च्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकात काँग्रेसला सर्वाधिक मतं म्हणजे 41 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाला 36 टक्के तर जेडीएसला 17 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. एक्झिटपोलनुसार कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज आहे. म्हणजेच एच डी देवेगौडा यांचा जनता दल धर्मनिरपेक्ष किंगमेकर ठरणार असल्याचं मानलं जातंय. 

कर्नाटकात काय आहेत गणितं?
कर्नाटक विधानसभा निकाल 2024 लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आल्यास दक्षिण भारतात भाजपचं वजन वाढेल. तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतही भाजपाला याचा फायदा होईल. तर काँग्रेसचा विजय झाल्यास भाजपाविरुद्ध त्यांचा आत्मविश्वास वाढेल. तसंच भाजपविरुद्ध विरोधक बांधत असलेली मोट मजबूत होईल आणि विरोधकांचा काँग्रेसवर भरोसा वाढेल. 

भाजप-काँग्रेसचा प्रचारात जोर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप, काँग्रेस आणि जेडीएसने पूर्ण जोर लावला होता. सर्व पक्षांचे प्रमुख नेते प्रचाराच्या मैदानात उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात एकूण 24 रॅली आणि रोड शो केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सर्वाधिक 35 रॅली आणि रोड शो केले. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी 31 रॅली-रोड शो केले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 12 सभा घेतल्या. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 21 रॅली केल्या. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी 22 रॅली आणि रोड शो केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 34 रॅलीला संबोधित केलं. तर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या केवळ एका जनसभेत सहभागी झाल्या होत्या.