कर्नाटक विधान परिषद उपसभापती धर्मगौडा यांची आत्महत्या

कर्नाटकातील राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी घटना सोमवारी मध्यरात्री समोर आली. 

Updated: Dec 29, 2020, 08:51 AM IST
कर्नाटक विधान परिषद उपसभापती धर्मगौडा यांची आत्महत्या title=

बंगळुरु : कर्नाटकातील राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी घटना सोमवारी मध्यरात्री समोर आली. कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती (Karnataka Legislative Council Deputy Speaker) एसएल धर्मगौडा (SL Dharme Gowda) यांनी आत्महत्या (commits suicide) केली. धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे रुळावर त्यांच्या मृतदेह आढळून आला. 

दरम्यान, कर्नाटक विधान परिषद उपसभापती धर्मगौडा यांनी आत्महत्या का केली त्याचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणी धर्मगौडा यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोटही सापडली आहे. गौडा यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कुटुंबीयांची माफी मागितली आहे. त्याचबरोबर संपत्तीची माहिती लिहून आपल्या मुलाला अर्धवट राहिलेले घर पूर्ण कर असे सांगितले आहे. 

अलिकडेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले होते. बेकायदेशीरपणे सभागृहाच कामकाज चालवत असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदारांनी केला होता.