बंगळुरु : कर्नाटकातील (Karnataka ) चित्रदूर्ग मठाचे (Sri Murugha Mutt) मठाधीश शिवामूर्ती मुरघा शरानारु ( Shivamurthy Murugha Sharanaru) यांना अटक करण्यात आलीय. लिंगायत समाजाचे शिवामूर्तींना अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपात कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चित्रदुर्ग जिल्हा कारागृहात (Chitradurga district jail) रवानगी करण्यात आली आहे.
दोन अल्पवयीन मुलींनी मैसूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर शिवामूर्तींविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. मठाच्या माध्यमातून चालत असलेल्या शाळेतील दोन मुलींवर 2019 ते 6 जून 2022 यादरम्यान लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
#UPDATE | Karnataka: Chief pontiff of Sri Murugha Mutt Shivamurthy Murugha Sharanaru shifted to district hospital after he complained of chest pain
He was kept in Chitradurga district jail https://t.co/VyP6Tubtxn
— ANI (@ANI) September 2, 2022
त्यानंतर या पीडित मुलींनी मठातून पळ काढत कोट्टनपेट पोलीस ठाणे गाठले. तेथील पोलीस अधिकाऱ्यांच्या सहाय्याने या मुलींनी या मठाधीशांविरोधात मैसूरच्या नाझारबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.अखेर पोलिसांनी शिवामूर्तींना अटक केली आहे. दरम्यान, शिवमूर्ती मुरुघा शरनारु यांना छातीत दुखू लागल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.