BJP MLA Assaulted : कर्नाटकातील (karnataka) चिकमंगळूर जिल्ह्यातील मुदिगेरे येथील भाजप आमदार एमपी कुमारस्वामी (bjp mla kumaraswamy) यांचे कपडे फाडल्याची घटना समोर आली आहे. गावातील संतप्त लोकांनी कुमारस्वामी यांच्याशी गैरवर्तन करत मारहाण केली आणि कपडे फाडल्याचा आरोप त्यांनी केला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना सुखरूप बाहेर काढले. कुमारस्वामी यांच्या म्हणण्यानुसार, हत्तीच्या हल्ल्यात (elephant attack) एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ गावकरी आंदोलन करत होते. गावकऱ्यांशी बोलण्यासाठी गेलो असताना ग्रामस्थ संतापले आणि त्यांनी हाणामारी सुरू केली. तर दुसरीकडे, पोलिसांच्या केलेल्या वक्तव्यामुळे आमदाराच्या दाव्यावर संशय निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आमदार एमपी कुमारस्वामी हे आपले फाटलेले कपडे दाखवत आहेत. गावकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध केला म्हणून त्यांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप कुमारस्वामी म्हणाले. तर आमदाराने हत्तीच्या हल्ल्यानंतर आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
मात्र, पोलीस उपअधीक्षक (SP) पुरुषोत्तम यांनी सांगितले की, कुमारस्वामी यांना त्यांच्या जीपमध्ये सुखरूप बसवून घरी पाठवण्यात आले. जोरदार वादावादीनंतर गावकऱ्यांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दुसर्या व्हिडिओमध्ये कुमारस्वामी पोलिसांच्या मदतीने जीपमध्ये बसताना दिसत आहेत, तर संतप्त गावकऱ्यांनी वाहनाला घेराव घातला होता.
Chikkamagaluru, Karnataka | Mudigere MLA from BJP, MP Kumaraswamy's clothes were allegedly torn by locals of Hullemane village when he visited them following the death of a woman in an elephant attack. The villagers alleged that the MLA didn't respond properly to elephant attacks pic.twitter.com/xIeCiSlBDX
— ANI (@ANI) November 21, 2022
"जेव्हा संतप्त गावकऱ्यांनी मुदिगेरे येथील भाजप आमदार एमपी कुमारस्वामी यांना घेराव घातला होता तेव्हा पोलीस उपनिरीक्षक आणि मी तिथे उपस्थित होतो. संतापलेल्या गावकऱ्यांनी जेव्हा कुमारस्वामी यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही लाठीचार्ज केला. त्यानंतर कुमारस्वामी यांना सुरक्षितरित्या त्यांच्या जीपमध्ये बसवले," असे पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम यांनी सांगितले.
The villagers were outraged & gave gherao to #BJP MLA #MPKumaraswamy. They have been driven on the main road of the village. Some of the villagers who were very indignant also abused with unspoken sounds. #BJPMLA's were grabbed & dragged.#Karnataka #Chikkamagaluru pic.twitter.com/NyY2oOegeT
— Hate Detector (@HateDetectors) November 20, 2022
दरम्यान, मुदिगेरे तालुक्यातील शोभा या त्यांच्या शेतात काम करत असताना रविवारी त्यांच्यावर हत्तीने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आंदोलन सुरु केले. हत्तींच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांसाठी गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेला जबाबदार धरले आहे.