माझा ही रेप होऊ शकतो - पीडितेची वकील

कठुआ बलात्कार हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर आज सोमवारी सुनावणी होणार आहे. 

माझा ही रेप होऊ शकतो - पीडितेची वकील

मुंबई : कठुआ बलात्कार हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर आज सोमवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील पीडित मुलीच्या विकल दीपिका सिंह राजवंत यांनी आपल्या जीवाला धोका असल्याच सिद्ध केलं आहे. ANI सोबत बोलताना दीपिका म्हणाली की, माझा देखील रेप होऊ शकतो किंवा हत्या देखील होऊ शकते. बहुदा मला कोर्टात प्रॅक्टीस करायाला दिली जाणार नाही. मला माहित नाही असं झालं तर मी कसं करेन. हिंदू विरोधात सांगत माझ्यावर बहिष्कार घातला गेला आहे. 

काय म्हणाली पीडितेची वकील 

ती पुढे म्हणाली की, जर माझ्यासोबत अशीच वर्तणूक राहिली तर भारतासाठी ही सर्वात शरमेची बाब असेल. एका लहान मुलीसोबत एवढ्या क्रूरतेने केलेले पाशवी अत्याचार केलेल्या या प्रकरणात कुणीतरी अडथळे आणत आहे. यांना माणूस म्हणायचं का हा प्रश्न आहे. तसेच आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी आता मी सुप्रीम कोर्टात सुरक्षेची मागणी केली आहे. मी याबाबत कोर्टात सांगणार आहे हे माझं दुर्भाग्य आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या या अवस्थेची कल्पना करू शकता. मी न्यायासोबत उभी आहे. आणि आपण सगळे त्या 8 वर्षाच्या मुलीसाठी न्याय मागत आहोत. 

आज होणार सुनावणी 

8 वर्षाच्या चिमुकलीवर जानेवारीत एक आठवडा कठुआ जिल्ह्यातील मंदिरात बंधिस्त करून तिला नशेची औषध देऊन सतत पाशवी अत्याचार केला. आणि मग तिची निघृण हत्या करण्यात आली. या 8 आरोपींमध्ये एका अल्पवयीनचा देखील सहभाग असून यावर वेगळी चार्जशीट जाहीर होणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कठुआतील मुख्य न्यायाधीश मॅजिस्ट्रेट कायद्यानुसार एक चार्जशीट दाखल करणार आहे.