भीषण दुर्घटना! बोगदा कोसळला; कर्मचारी अडकले

जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी रात्री मोठी भीषण दुर्घटना घडली. रामबन जिल्ह्यातील मीरकोट परिसरात बोगदा कोसळला

Updated: May 20, 2022, 10:40 AM IST
भीषण दुर्घटना! बोगदा कोसळला; कर्मचारी अडकले title=

जम्मू काश्मीर:  जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir)  गुरुवारी रात्री मोठी भीषण दुर्घटना घडली. रामबन जिल्ह्यातील मीरकोट परिसरात बोगदा कोसळला. ही दुर्घटना खूनी नाल्याजवळ (khooni Nala) घडली आहे. बोगदा निर्माणाधीन होता. बोगद्याच्या ऑडिटचं काम सुरु होतं. अशात बोगद्याचा भाग कोसळला. या दुर्घटनेत 10 कामगार बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भारतीय जवानांची एक कूमक घटनास्थळी पोहोचली. सध्या घटनास्थळी बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.

 
बोगद्याचा एक छोटासा भाग कोसळला

जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर चार लेनच्या बोगद्याचे काम सुरु होते. यावेळे बोगद्याची ऑडिट करणारी टीम ऑडिट करत असताना बोगद्याचा मोठा भाग कोसळला. दुर्घटनेत काही कर्मचारी अडकले. तात्काळ बचावकार्य सुरु झाले. जखमी अवस्थेतील चार जणांना तात्काळ वाचवण्यात यश आलं. कर्मचाऱ्यांचे बचावकार्य सध्या सुरु आहे. दुर्घटनेच्यावेळी बोगद्याच्या समोर उभ्या असणारे जेसीबी आणि बुलडोझर आणि ट्रकचं मोठं नुकसान  झालंय.

लडाखच्या नुब्रा परिसरात याआधी अशीच एक दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत निर्मानाधीन पुलाचा भाग कोसळला होता. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर दोन जणांना वाचवण्यात यश आलं होतं