जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचे दर

बुधवारी दिल्लीत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ४० हजार २४१ रुपये

Updated: Mar 19, 2020, 12:18 PM IST
जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचे दर  title=

नवी दिल्ली : जास्त मागणीमुळे बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव 311 रुपयांनी वधारले. रुपयाच्या घसरणीमुळे सोनं प्रति दहा ग्रॅम 40,241 रुपये झाले. मंगळवारी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 39,930 रुपयांवर बंद झाला.

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 311 रुपयांनी वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंगळवारी सोन्याच्या किंमतीत झालेल्या वाढीचा हा परिणाम मानला जातो. दिवसाच्या व्यापारात रुपया 13 पैशांनी कमी झालेला पाहायला मिळाला. यामुळे देशातील सोन्याच्या किंमतीतही वाढ झाली.

बुधवारी दिल्लीत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ४० हजार २४१ रुपये, मुंबईत प्रति १० ग्रॅम ४० हजार ३७५ तर चेन्नईमध्ये ३९ हजार २२० रुपये आणि कोलकाता येथे ३८ हजार ६८० रुपये प्रति तोळा दराने विकले गेले.

चांदीचा 468 रुपयांनी घसरून ३५ हजार ९४८ रुपये प्रतिकिलोग्रॅम राहीला.  मंगळवारी हा दर प्रति किलो ग्रॅम ३६ हजार ४१६ रुपयांवर बंद झाला होता. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीचे दर क्रमश: १ हजार ४९० डॉलर आणि १२.३८ डॉलर प्रति अंशच्या दरम्यान राहीले. या दरम्यान सेन्सेक्स १,७०९.५८ अंकांनी घसरून २८,८६९ वर बंद झाला.