नवी दिल्ली : रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नेहमी असे होते की प्रवास करताना तुम्हांला तिकीट चेकर कुठे बसतो ही माहिती नसते. त्यामुळे तुम्ही त्याचा शोध संपूर्ण ट्रेनभर करत बसतात. आता रेल्वेच्या नव्या नियमानुसार टीटीईचा शोध तुम्हांला करावा लागणार नाही.
रेल्वेने एक सर्कुलर जारी करत ट्रेनच्या सर्व श्रेणींमध्ये टीटीई आणि सुरक्षा गार्डाचा बर्थ फिक्स केला आहे. रेल्वेकडून उचलण्यात आलेल्या पावलांचा उपयोग वेटिंग आणि आरएसी तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी होणार आहे.
सामान्यतः आरएसी आणि वेटिंग तिकीटवर प्रवास करणारे प्रवासी तिकीट चेकरला रेल्वेच्या डब्यांत शोधत असतात. अशात प्रवाशांना टीटीई सापडत नाही त्यामुळे तिकीट काढून सुद्धा बोगीमध्ये खाली झोपावे लागते आणि प्रवास करावा लागतो.
झी २४ तास सांगेल कोणत्या ट्रेनमध्ये कोणत्या बर्थवर भेटणार टीटीई
शताब्दी, राजधानी एक्स्प्रेससोबत मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनमध्ये टीटीई प्रत्येक स्लीपर कोचच्या ७ नंबर बर्थवर टीटीईसाठी बर्थ निश्चित केले आहे. तसेच तुम्ही इंटरसिटीमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हांला टीटीईच्या शोधात भटकण्याची गरज नाही. टीटीई अल्टरनेट कोच म्हणजे D1, D3, D5 आणि D7मध्ये १ नंबर बर्थवर असणार आहे.
तुम्ही गरीबरथ (चेअरकार) ने प्रवास करत असाल तर या ट्रेनमध्ये टीटीई अल्टरनेट कोच G1, G,3, G5, G5 कोचच्या ७ नंबर बर्थवर असणार आहे. गरीब रथच्या इकॉनॉमी क्लासमध्ये तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हांला टीटीई कोच B1 आणि BE1मध्ये ७ क्रमांक बर्थवर असणार आहे.
तसेच सुपरफास्ट ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टीटीईला भेटण्यासाठी A1 कोचमध्ये जावे लागेल. A1 कोचमधील ५ क्रमांकाच्या बर्थ हा टीटीईसाठी रिझर्व्ह ठेवण्यात आला आहे. आरपीएफ आणि जीआरपी स्टाफसाठी रेल्वेने S1 मधील 63 क्रमांकाचा बर्थ ठेवला आहे.