मुंबई : लग्न असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम, तुम्ही पाहिले असेल की, प्रत्येकजण शगुन फक्त 11, 21, 51, 101 रुपये देतो. तुम्ही जे काही पैसे देता, त्याला एक रुपया जोडून दिला जातो, पण तुम्ही कधी विचार केला आहे की, हे का करतात? पैशांमध्ये एक रुपया जोडून का दिले जाते, हे जाणून घेणे मनोरंजक आहे. अशा परिस्थितीत, त्यामागचे कारण आणि परंपरा काय आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
यामागे कोणतेही विशेष आणि महत्त्वाचे तथ्य नसले तरी, बहुतेक लोक हे केवळ परंपरेनुसार करतात. म्हणजेच, लोक हे खूप आधीपासूनच करत आले आहेत. त्यामुळे आता लोक ही परंपरा फक्त फॉलो करतात आणि त्यामागे कोणतेही महत्त्वाचे कारण नाही. परंतु जर यात तुम्ही निट संशोधन केले, तर ही परंपरा अनेक गोष्टींशी निगडित आहे.
जर तुम्ही इतिहासात पाहिलात तर तुम्हाला समजेल की, यामागचे कारण काय असू शकते. खरं तर, बर्याच अहवालांमध्ये असे म्हटले गेले आहे की, जुन्या दिवसांमध्ये कोणत्याही शुभ कार्यासाठी 20 आना देण्याची परंपरा होती, म्हणजे 1 रुपया आणि 25 पैसे म्हणजे सव्वा रुपये. एक रुपयामध्ये 16 आने आहेत आणि म्हणूनच 50 पैशांना आठाना आणि 25 पैशांना चाराना म्हणतात.
म्हणजेच, त्या काळापासून एखादी गोष्ट वाढवण्याची परंपरा आहे, जसे की जर तुम्ही 1 रुपयामध्ये 25पैसे वाढवले तर तो सव्वा रुपाये होते.
बर्याचदा लोकांना असे मानने आहे की, जेव्हा कोणतीही रक्कम शून्यावर येते तेव्हा ती अंतिम होते. तशाच प्रकारे, जर तुम्ही नातेसंबंधात शून्याच्या आधारावर नकारात्मकता दिलीत, तर ते नाते संपुष्टात येते. म्हणून त्यापैशांवर 1 रुपया वाढवला जातो.
शून्य व्यतिरिक्त, प्रत्येक संख्येचे सर्व गोष्टीशी कनेक्शन असते, जसे 7 म्हणजे स्पतऋषी, 9 म्हणजे नऊदेवी किंवा नऊग्रह इत्यादी आहे. यामुळे शून्याला शुभ नसल्याने त्याला एक रुपया जोडला जातो.
वास्तविक, यातही विचार करायला लावणारा एक अँगल आहे. जर तुम्हाला कोणी 51 रुपये दिले, तर तुम्हाला ते असे जाणवते की, हे पैसे 50 रुपयापेक्षा जास्त आहे आणि तुम्हाला त्यात एक रुपया अधिक मिळवण्याचा अनुभव आहे.
जर तुम्हाला 59 दिले तर तुम्हाला मनात असे वाटत राहिल की, त्यामध्ये 60 रुपये पूर्ण व्हायला एक रुपया कमी आहे. त्यामुळे एक रुपया वाढवलेली किंमत तुम्हाला दर्शवते म्हणून देखील लोकं प्रत्येक गोष्टीत एक रुपाया वाढवून देतात.