Drinking Alcohol : दारू ही आरोग्यासाठी हानीकारक (Harmful) आहे. दारूच्या अति सेवनामुळे किडनी, (Kidney) लिवर (Liver) खराब होण्याचा धोका उद्भवू शकतो. पण एका नव्या अभ्यासानुसार (Study) दारुचे काही फायदे सांगण्यात आले आहे. रिसर्चमध्ये (Research) केलेल्या दाव्यानुसार दारुमुळे मनुष्यात भाषा कौशल्य सुधारतं. विशेष करुन परदेशी भाषा. म्हणजे दारू प्यायल्यानंतर अनेक भारतीयांचना इंग्रजी बोलण्याचा मोह होतो.
आपण अनेक वेळा पाहिलं असेल दारू प्यायलेला व्यक्ती फर्राटेदार इंग्रजी बोलतो. इंग्रजीचं तुटकं, मुटकं ज्ञान असलेलेही दारू प्यायल्यानंतर इंग्रजी (English) बोलण्याचा प्रयत्न करतात. या अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीला दारूची (Alcohol) नशा चढली तर तो इतर काही विदेशी भाषा बोलू लागतो. हा अभ्यास सायकोफार्माकोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
सायन्स डेलीने दिलेल्या रिपोर्टनुसार, किंग्ज कॉलेज लंडन, लिव्हरपूल युनिव्हर्सिटी आणि मास्ट्रिच युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एकत्रितपणे हा रिसर्च केला आहे. मद्यपान केल्यानंतर लोकांचे दुसऱ्या भाषेचे कौशल्य सुधारते आणि ते त्या भाषेत अस्खलितपणे बोलू लागतात.
जेव्हा जर्मन लोक डच बोलू लागतात
डच यूनिव्हर्सिटीत (Dutch University) शिकणाऱ्या काही लोकांवर या रिसर्चअंतर्गत अभ्यास करण्यात आला आहे. मातृभाषा (Mother Tongue) जर्मन असणाऱ्या काही लोकांना दारू पाजण्यात आली. दारू पिण्याआधी सर्व जर्मन भाषेत (German Language) बोलत होते, ही लोकांनी नुकतीच डच भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे. पण दारू प्यायालयानंतर ही लोकं अस्खलित डच बोलू लागली. हे संभाषण रेकॉर्ड करण्यात आलं. डच भाषा शिकणारे जर्मन विद्यार्थी उत्तमरित्या डच भाषा बोलत होते. विशेष म्हणजे त्यांची डच बोलण्याची क्षमता कितीतरी पटीने वाढली होती.
दारूमुळे आत्मविश्वास वाढतो
इंग्रजी किंवा इतर कोणतीही परदेशी भाषा बोलण्यासाठी बौद्धिक क्षमता आणि आत्मविश्वास असणं आवश्यक आहे. अल्कोहोलमुळे मानवाची बौद्धिक क्षमता बिघडते आणि त्याचा वाईट परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. पण या नव्या अभ्यासात वेगळेच परिणाम समोर आले आहेत. नवीन अभ्यासानुसार अल्कोहोल बौद्धिक क्षमता मजबूत करते आणि यामुळे आत्मविश्वास देखील अनेक पटींनी वाढतो.
अस्वस्थता, चिंता आणि भीती निघून जाते
नवीन अभ्यासानुसार अल्कोहोलमुळे मानवाच्या मनातील सामाजिक चिंता देखील दूर करते. म्हणजे गर्दी पाहून मनातील अस्वस्थता किंवा भीती दारू पिऊन निघून जाते. दारुच्या प्रभावामुळे जेव्हा इतर लोकांशी संभाषण होते, तेव्हा त्या व्यक्तीची दुसऱ्या भाषेत बोलण्याची क्षमताही वाढते. याचे परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावरही पाहिला मिळतात.
Disclaimer : वरील मुद्दे हे एका संस्थेने केलेल्या रिचर्समधून समोर आले आहेत. झी 24 तास या मतांशी पुष्टी करत नाही. दारू पिणं हे आरोग्यासाठी हानीकारक आहे.