कोलकाता : पश्चिम बंगाल राजधानी कोलकाता मध्ये एक अनोखे मंदिर आहे. या मंदिरातील कालीमातेला भक्तांकडून फळ, फुलेच नाही तर नूडल्स आणि भाज्यांचा नैवेद्यही दाखविला जातो.
अहवाल नुसार, जे लोक हे नूडल्स, भाज्या, तांदूळ कालिमातेला नैवेद्य म्हणून देतात त्यांची मनोकामना पूर्ण होते अशी मंदिरात येणाऱ्या लोकांची अशी श्रद्धा आहे .तस पाहायला गेल तर हा भाग कोलकातातील टेगरा भागात येतो. याठिकाणी चिनी लोक जास्त संख्येने राहतात. म्हणूनच या मंदिरात कालीमातेचे जास्त भक्त हे चीनी आहेत. याव्यतिरिक्त,कालीमातेच्या मंदिरात मंदिरात जाणारे भारतीय लोक फळ, भाज्या आणि मिठासारखे फळ देवीला अर्पण करतात. विशेष गोष्ट म्हणजे चिनी नागरिक चेन हे मंदिर समितीचे प्रमुख आहेत. असे म्हटले जाते की हे मंदिर सुमारे सहा दशके जुने आहे.