मिस व्हिलचेअर स्पर्धेत 'ती' करणार भारताचं प्रतिनिधित्व !

 ऑक्टोबर महिन्यात पोलंडमध्ये होणाऱ्या ‘मिस व्हिलचेअर’ सौंदर्य स्पर्धेत ३१ वर्षांची राजलक्ष्मी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. २०१४ मध्ये तिने ‘मिस व्हिलचेअर इंडिया’ स्पर्धेत ‘मिस व्हिलचेअर’चा किताब पटकावला होता.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 26, 2017, 08:23 PM IST
मिस व्हिलचेअर स्पर्धेत 'ती' करणार भारताचं प्रतिनिधित्व ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : ऑक्टोबर महिन्यात पोलंडमध्ये होणाऱ्या ‘मिस व्हिलचेअर’ सौंदर्य स्पर्धेत ३१ वर्षांची राजलक्ष्मी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. २०१४ मध्ये तिने ‘मिस व्हिलचेअर इंडिया’ स्पर्धेत ‘मिस व्हिलचेअर’चा किताब पटकावला होता.

राजलक्ष्मी डेंटिस्ट आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे तिला कायमच अपंगत्व आलं. पण अपंगत्वामुळे खचून न जाता तिने आपल्या आवडीच्या विषयात अभ्यास करणं सुरूच ठेवलं. वैद्यकिय क्षेत्रातल्या अभ्यासाबरोबर तिने आपली फॅशनची आवडही जपली. २०१४ मध्ये झालेल्या ‘मिस व्हिलचेअर’ स्पर्धेत सहभाग घेऊन तिने साऱ्या जागचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

त्याचबरोबर तिने व्हिलचेअर बास्केटबॉल  आणि नृत्य स्पर्धेतही भाग घेतला होता. राजलक्ष्मीचा दवाखाना देखील असून, ती अनेक सामजिक कार्यात सहभागी होते. अपघातामुळे तिचं आयुष्य उद्धवस्त झालं असलं, तरी तिने जगणं मात्र सोडलं नाही. तिच्या या जिद्दीने ती अनेकांना जगण्याची नवी उमेद देते.