सिंगल चार्जनंतर 250 किमीपर्यंत धावणार ही क्रूजर मोटरसायकल; लवकरच होणार लॉंच

komaki ranger electric cruiser : कोमाकी इलेक्ट्रिक व्हेइकल्सने अखेर आपल्या वेबसाइटवर बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकल सादर केली आहे..

Updated: Jan 13, 2022, 04:06 PM IST
सिंगल चार्जनंतर 250 किमीपर्यंत धावणार ही क्रूजर मोटरसायकल; लवकरच होणार लॉंच title=

मुंबई : कोमाकी इलेक्ट्रिक व्हेइकल्सने अखेर आपल्या वेबसाइटवर बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकल सादर केली आहे. ही भारतातील पहिली पूर्णे इलेक्ट्रिक मोटरसायकल म्हणून समोर आली आहे. कंपनी 16 जानेवारीला या इलेक्ट्रिक बाइकच्या किमती जाहीर करणार आहे. कोमाकी रेंजर नावाची, ही इलेक्ट्रिक मोटरसायकल टिपिकल क्रूझर डिझाइनवर तयार करण्यात आली आहे. जी दिसायला खूपच सुंदर आहे आणि बदललेल्या बजाज अॅव्हेंजरसारखी दिसते.

ब्राइट क्रोम गार्निश
कोमाकीने बाईकची स्टाइल अतिशय आकर्षक आहे. मोटारसायकलला चमकदार क्रोम गार्निश लावण्यात आले आहे. शिवाय दोन गोल आकाराचे लाईटदेखील आहेत. या हेडलॅम्पच्या दोन्ही बाजूला रेट्रो-थीम असलेले साइड इंडिकेटर देखील आहेत. 

मागील सीटला बॅकरेस्ट
रायडर सीट खालच्या भागात लावण्यात आली आहे. तर मागच्या प्रवाशाच्या आरामदायी प्रवासासाठी, मागच्या सीटवर बॅकरेस्ट बसवण्यात आला आहे. 
 
सिंगल चार्जमध्ये  250 किमीपर्यंत धावते
कोमाकीने माहिती दिली की, रेंजर इलेक्ट्रिक क्रूझर 4 kWh बॅटरी पॅकसह येईल जे 5,000 वॅट मोटरसह येईल. रेंजर ईव्ही एका चार्जमध्ये 250 किमीपर्यंत धावू शकते असा दावाही कंपनीने केला आहे.