मीराप्रमाणे कृष्ण भक्तीत लीन! 23 वर्षांची शिवानी, बाळ कृष्णासोबत घेणार 7 फेरे

Shivani Marry Laddu Gopal: शिवानीचे लग्न कोणत्या खास व्यक्तीसोबत नव्हे तर लड्डू गोपालसोबत होणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 24, 2024, 08:42 AM IST
मीराप्रमाणे कृष्ण भक्तीत लीन! 23 वर्षांची शिवानी, बाळ कृष्णासोबत घेणार 7 फेरे  title=
Shivali Marry Laddu Gopal

Shivani Marry Laddu Gopal: मीराची प्रभू कृष्णावरील भक्ती आपण कथांमधून ऐकली असेल. 21 व्या शतकातही अशी कोणती मीरा कृष्णावर एकतर्फी प्रेम करताना पाहिले आहे का? मीराच्या कहाणीशी मिळतीजुळती कथा मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये घडतेय. येथे एक अनोखा विवाह होणार आहे. याची चर्चा देशातच नव्हे तर संपूर्ण भारतात होत आहे. न्यू बृज विहार कॉलनीमध्ये राहणारी शिवानी कृष्ण भक्तीत नेहमी तल्लीन असते. तिने लड्डू गोपालसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. 

शिवानी आणि लड्डू गोपाल यांचे लग्न होळीनंतर होणार आहे. यासाठी तिच्या घरात लग्नाची तयारी सुरु आहे. शिवानीचे वडील राम प्रताप सिंह परिहार सिक्योरिटी गार्ड आणि आई हॉस्टेलमध्ये कर्मचारी आहे. दोघेही शिवानीच्या या निर्णयामुळे खरतर नाराज आहेत. ते मुलीसाठी स्थळ देखील पाहत होते. धुमधडाक्यात मुलीचं लग्न व्हाव असं त्यांना वाटत होतं. पण शिवानीने लड्डू गोपालसोबतच आपण लग्न करणार असल्याचा हट्ट तिने धरला. त्यामुळे आई-वडिलांना तिच्या निर्णयापुढे काही करता आले नाही. शिवानी रामप्रताप सिंह यांची तिसरी मुलगी आहे. 3 बहिणींमध्ये शिवानी सर्वात छोटी आहे. 

शिवानीही मध्य प्रदेशच्या ग्वालियर कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थीनी आहे. हे लग्न कोणत्या खास व्यक्तीसोबत नव्हे तर लड्डू गोपालसोबत होणार आहे. घरी शिवानीचे हात पिवळे करण्याची तयारी सुरु आहे. ग्वालियरच्या न्यू बृज विहार कॉलनीमध्ये राहणारी शिवानी आता भगवी वस्त्र परिधान करुन बोहल्यावर चढणार आहे. 

शिवानीने बीकॉमपर्यंत शिक्षण घेतलंय. लड्डू गोपालसोबत लग्न करावं ही आपली लहानपणापासूनची इच्छा होती,असं शिवानी सांगते.  लड्डू गोपाल नेहमी माझ्या स्वप्नात यायचे. यावेळी लग्नाचे विधी होताना दिसायच. आता शिवानीचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. तिने आपले पूर्ण आयुष्य लड्डू गोपालला समर्पित केलंय. 

15 एप्रिलला होणार लग्न 

शिवानीच्या आईने तिला कृष्ण गोपाळाची पितळेची मूर्ती आणून दिली. ती मुर्ती शिवानीच्या नेहमीसोबत असते. माझ्या लग्नामुळे घरातील मंडळी खूश नाहीयत. पण मला त्याची पर्वा नाहीय. मीरानेदेखील खूप त्याग केला होता. तर मग मी लड्डू गोपालसाठी खोटं नातं सोडू शकत नाही का? ज्याने मला हे आयुष्य दिलंय, त्यालाच हे जीवन समर्पित करायचंय, असे ती सांगते. 

पारंपारिक पद्धतीनं लग्न 

शिवानीचे लग्न 15 एप्रिलला होणार आहे. याआधी हळदी आणि तेलटा सोहळा, 16 तारखेला मंडप, 17 तारखेला वरात आणि 18 तारखेला शिवानीची पाठवणी केली जाणार आहे. ग्वालियरच्या डोंगरातील शिव मंदिरात पारंपारिक पद्धतीने विवाह सोहळ संपन्न होणार आहे.