Lakhimpur Kheri Violence : आता हुकूमशाही, खून आणि बलात्कार करणारे जेल बाहेर - राहुल गांधी

Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेश (UP) सरकार फक्त आम्हाला थांबवत आहे. परंतु इतर पक्षाचे लोक जात आहेत. खून आणि बलात्कार करणारे जेल बाहेर आहेत, अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली.

Updated: Oct 6, 2021, 10:50 AM IST
Lakhimpur Kheri Violence : आता हुकूमशाही, खून आणि बलात्कार करणारे जेल बाहेर - राहुल गांधी title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेश (UP) सरकार फक्त आम्हाला थांबवत आहे. परंतु इतर पक्षाचे लोक जात आहेत. इथे आम्ही राजकारण करत नाही. आम्ही प्रेशर निर्माण केले म्हणून करवाई होत आहे. आम्ही आज लखीमपूर खेरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र, खून आणि बलात्कार करणारे जेल बाहेर आहेत, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यावेळी केली.

राहुल गांधी यांनी लखनऊला रवाना होण्यापूर्वी दिल्लीत  विमानतळावर पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, विरोधकांचे काम दबाव निर्माण करणे आहे. जेणेकरून गुन्हेगारांना शिक्षा होईल. आम्ही हातरसला गेलो नसतो तर दोषींवर कारवाई झाली नसती. आमचे काम सरकारवर दबाव आणणे आहे, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना (Farmers protest) चिरडले हे दाखवण्याची जबाबदारी मीडियाचा होती. परंतु तुम्ही तुमची जबाबदारी योग्य पद्धतीने पाळली नाही, असे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी पुन्हा मीडियावर खापर फोडले. देशात आधी लोकशाही होती, आता हुकूमशाही आली आहे, अशी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी लखीमपूर खेरीला का गेले नाही, असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.

राहुल गांधी म्हणाले की, मला लखनऊ विमानतळाच्या बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, कदाचित मला दिल्ली विमानतळावरही थांबवले जाईल. ते म्हणाले की आम्ही तीन लोक लखीमपूरला जात आहोत, कलम 144 5 लोकांना लागू आहे. याबाबत आम्ही प्रशासनाला आधीच कळवले आहे.