Goa News : गोव्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजप आमदाराने व्यावसायिकाला धमकावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असून नागरिकांच्या सुरक्षेबबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गोव्यातील मोर्मुगावात भाजपचे आमदार संकल्प अमोणकर यांच्यावर व्यावसायिकाला धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये आमदार संकल्प अमोणकर एका व्यावसायिकाला दमदाटी करत धमकावत असल्याचा संवाद ऐकू येत आहे. बैना बीचवर एका वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर व्यवसाय करतो. व्यवसाय चालवण्यासाठी अमोणकर हे त्याच्याकडून कथितरित्या एक लाख रुपयांची भरपाई मागत असल्याचा आरोप केला जात आहे. पैसे ने दिल्यासव्यवसाय बंद करण्याची कथित धमकी अमोणकर देत असल्याचा आरोप केला जात आहे. ही क्लिप अमोणकर यांचीच आहे याची पुष्टी झालेली नाही.
विरोधकांनी आणखा एक कथित प्रकरण समोर आणले आहे. भाजपचे दक्षिण गोव्याचे जिल्हा अध्यक्ष तुलसीदास नायक यांच्यावर मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कॉर्टालिमचे अपक्ष आमदार एंटोन वाज आणि स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडला आहे. मारहाण होत असताना कोणीही हस्तक्षेप केला नाही असा आरोप गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.
Mr @goacm @DrPramodPSawant & @DGP_Goa what is happening in Goa ? Goonda Raj under the @BJP4India regime is now operating in day light in Goa at Sancoale in presence of Cortalim Independent MLA Anton Vaz supporting the @BJP4Goa Govt and Police Officers remain spectators while… pic.twitter.com/2kkAIHBfJ4
— Amit Patkar (@amitspatkar) September 5, 2024
या कथित घटनांवरुन विरोधकांनी गोवा सरकारला धारेवर धरले आहे. याप्रकरणांवरून गोव्याचे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून विरोधकांनी सरकारवर टीका करत नागरिकांच्या सुरक्षेबाबच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
AUS
(70.3 ov) 225 (37 ov) 121
|
VS |
WI
143(52.1 ov) 27(14.3 ov)
|
Australia beat West Indies by 176 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.