Leopard Cat Photo Viral : जगात असे अनेक विलक्षण प्राणी आहेत, की त्यांच्या विषयी माहिती मिळाल्यावर आश्चर्यकारक वाटतं. अनेक देशांमध्ये वेगवेगळे माहित नसलेले प्राणी राहतात. परंतु आपल्याला माहिती फक्त काहींच प्राण्यांबद्दल असते. भारतीय जंगलांमध्ये असाच एक प्राणी पहायला मिळाला आहे. ज्याच्याबद्दल सर्वच अजाण आहेत. त्याबाबतीत एक फोटो व्हायरल होत आहे.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा (IFS)यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. फोटोला पोस्ट करून त्यांनी सोशलमीडिया युजर्सला म्हटलं आहे की, ओडीसाच्या जंगलांतील या प्राण्याला ओळखा?
फोटो पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावून जाल. फोटोतील प्राणी ना बिबट्या आहे ना मांजर. परंतु या दोघांशी मिळता जूळता हा प्राणी भारतीय जंगलात सापडला आहे.
Identify this from the wilds of Odisha pic.twitter.com/kxXmOvLe6r
— Susanta Nanda IFS (@susantananda3) May 6, 2021
वन अधिकारी सुशांत यांनी ट्वीट करून माहिती दिली की, ही एक Lepard Cat आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम अनुसार अनुसूची (I)मधील प्राण्यांप्रमाणे याचा काही लोकांनी अचुक अंदाज लावला आहे.
ओडिसातील मयूरभंज जिल्ह्यात कॅमेऱ्या कैद झालेल्या या प्राण्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.