Leopard Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो व्हिडिओ पाहून माणूसकी शिल्लक राहिली आहे की नाही असा प्रश्न पडतो. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क बिबट्याची शेपटी आणि पाय धरून ओढत असताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे त्याच्या आजूबाजूला आणखी काही लोकं असून ते या व्यक्तीला थांबवण्याऐवजी मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग करताना दिसत आहेत.
बिबट्याचा छळ करतानाचा व्हिडिओ
वनसेवा अधिकारी (IFS) प्रवीण कंसवा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. यात त्यांनी लिहिलंय, 'या व्हिडिओमध्ये प्राणी कोण आहे ते ओळखा!'. ही घटना कधी आणि कुठे घडली हे कळू शकलेले नाही. या बिबट्याचा नंतर मृत्यू झाल्याचं समजतंय.
प्रवीण कंसवा यांनी या कृत्याचा निषेध करत वन्य प्राण्यांना अशी वागणूक देऊ नये असं म्हटलंय. वन्य जीवांबरोबर अशा क्रुर पद्धतीने वागण्याची हा मार्ग नाही, तेही सजीव आहेत, काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी दिलाय.
Identify the animal here !! pic.twitter.com/MzAUCYtBOM
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) August 17, 2022
व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया
व्हिडिओ ट्विटरवर शेअर झाल्यानंतर तब्ब 79 हजारवेळा हा व्हिडिओ बघितला गेला आहे. तरुणाच्या या घृणास्पद वागणुकीबद्दल लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'या व्यक्तीला तुरुंगात पाठवायला हवं असं एका व्यक्तीने लिहिलंय. तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, 'अरे देवा, हे खूप दुःखद दृश्य आहे. आपण अशा समाजात राहतो जिथे एखादी व्यक्ती इतरांच्या भल्यासाठी मदतीचा हात पुढे करते, मग तो माणूस असो वा प्राणी. या
याआधी मे महिन्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात मध्य प्रदेशातील एका गावातील काही लोकं वाघाच्या दोन पिल्लांवर दगडफेक करून त्यांना जखमी करताना दिसत होते. घटना सिवनी इथल्या बेळगाव गावातील होती.