LIC च्या 'या' योजनेतून महिलांना मिळणार घसघशीत परतावा; लहानशा गुंतवणुकीचा भरघोस फायदा

LIC Policies : एलआयसीकडून देशातील नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीनं अनेक योजना आखल्या जातात. या योजनांना तितकाच चांगला प्रतिसादही मिळतो. 

सायली पाटील | Updated: Nov 8, 2023, 01:38 PM IST
LIC च्या 'या' योजनेतून महिलांना मिळणार घसघशीत परतावा; लहानशा गुंतवणुकीचा भरघोस फायदा   title=
LIC Aadhaar Shila Policy details and benefits for women

LIC Aadhaar Shila Policy : भारतात अनेक खासगी कंपन्यांकडून आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनं  काही योजना आखून दिल्या जातात. अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. या साऱ्यामध्ये देशातील एक विश्वासार्ह संस्था ठरते ती म्हणजे एलआयसी. LIC मध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा अतिशय मोठा असून, येथील योजनांच्या माध्यमातून हमखास परतावा मिळतो. 

आर्थिक बाजारपेठेमध्ये कितीही उलाढाली झाल्या तरीही ठेवीदारांच्या पैशांवर LIC कोणताही परिणाम होऊन देत नाही. यास विश्वासापोटी सातत्यानं LIC मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांचा आकडा वाढताना दिसत आहे. याच संस्थेक़डून महिलांसाठीसुद्धा एक फायद्याची योजना आखण्यात आली आहे. LIC आधार शिला, असं या योजनेचं नाव. या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यास महिलांना समाधानकारक परतावा मिळतो, असा दावा एलआयसी करते. 

हेसुद्धा वाचा : 'दोन महिने स्वत:च बनवलेली खिचडी खाल्ली', कारण ठरले वाजपेयी; पंकज त्रिपाठींनी सांगितला किस्सा 

 

आधारशिला पॉलिसीच्या अंतर्गत बेसिक सम 75000 रुपये इतकं आहे, तर, जास्तीत जास्त रक्कम 3,00,000 इतकी आहे. तुम्ही या योजनेमध्ये पैसे गुंतवू इच्छित असाल तर, मासिक, त्रैमासिक, सहा महिने आणि वार्षिक अशा फरकानं गुंतवणूक करण्याचे पर्याय देण्यात येतात. 

जाणून घ्या या योजनेविषयी...

LIC आधार शिला स्कीम एक नॉन-लिंक्ड व्यक्तिगत Life Insurance Scheme आहे. महिलांसाठीच या योजनेची आखणी करण्यात आली असून, मॅच्युरिटीच्या वेळी ठेवीदारांना एक निश्चित धनराशी देण्यात येते. निर्धारित काळाआधी या योजनेतून पैसे काढल्यास अर्थात ठेवीदाराचं अकाली निधन झाल्यास कुटुंबीयांना रक्कम देण्यात येते. या योजनेमध्ये शारीरिकदृष्ट्या सुदृढ, कोणताही आजार नसणाऱ्याच व्यक्ती गुंतवणूक करु शकतात. 

नियम आणि अटींबाबत सांगावं तर, UIDAI कडून देण्यात आलेलं आधार कार्ड असणारी कोणीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. इथं किमान वयोमर्यादा 8 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 55 वर्षे इतकी आहे. त्यामुळं आता या योजनेत तुम्हाला कधी गुंतवणूक करायचीये हे आताच ठरवा. कारण, गुंतवणूक करत असताना अनेकदा आपण टाळाटाळ करतो. पण, योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करत भविष्याच्या दृष्टीनं आर्थिक नियोजन करणं कधीही फायद्याचं.